Ashok Kharat : चौकशीदरम्यान अशोक खरातची खालावली प्रकृती, चर्चांना उधाण

spot_img

भोंदू बाबा म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात एक महत्त्वाची आणि नाट्यमय घडामोड समोर आली आहे. विशेष तपास पथक (SIT) त्याची कसून चौकशी करत असतानाच त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली. चौकशीदरम्यान खरात याला मळमळ, उलट्या, तीव्र डोकेदुखी तसेच छातीत दुखण्याची तक्रार सुरू झाली, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

स्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात येताच अधिकाऱ्यांनी तत्काळ वैद्यकीय मदतीची व्यवस्था केली. कार्डियाक ॲम्बुलन्स बोलावण्यात आली आणि डॉक्टरांच्या टीमकडून तातडीने तपासणी करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ त्याला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. सध्या डॉक्टरांकडून त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून पुढील उपचाराबाबत निर्णय घेतला जात आहे.

या घटनेला आणखी एक वेगळं वळण देणारी बाब म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच खरातच्या वकिलांनी न्यायालयात त्याला न्यूरोलॉजिकल समस्या असल्याचा दावा केला होता. तसेच त्याला न्यूरोसर्जनकडे तपासणीसाठी नेण्याची मागणीही करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आता अचानक प्रकृती खालावल्याने या प्रकरणाबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

दरम्यान, खरातची पोलीस कोठडी उद्या संपणार असल्यामुळे SIT कडून तपासाची गती वाढवण्यात आली आहे. महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी अधिकारी सक्रिय झाले असून उद्या त्याला न्यायालयात पुन्हा हजर केलं जाणार आहे. या वेळी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ