महामार्गावरून प्रवास करताना तुम्ही हिरव्या रंगाच्या पाट्या नक्कीच पाहिल्या असतील. या पाट्यांवर सुरक्षिततेची माहिती आणि पुढील ठिकाणांचे संकेत असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, या पाट्या नेहमी हिरव्याच का असतात? यामागे आहे एक खास वैज्ञानिक आणि मानसिक कारण!हिरवा रंग हा मानवी डोळ्यांना अत्यंत सौम्य आणि शांत वाटतो. वाहन चालवताना चालकाचे लक्ष विचलित होऊ नये, यासाठी हा रंग खास निवडला जातो. हिरवा रंग जास्त वेळ पाहिल्यावरही डोळ्यांना त्रास होत नाही आणि तो निसर्गाशी सहज मिळता-जुळता असतो.
त्यामुळे महामार्गावरील साईनबोर्ड्ससाठी हा रंग आदर्श ठरतो.लाल किंवा पिवळ्यासारखे रंग चटकन लक्ष वेधतात, पण ते चेतावणी किंवा धोक्याचे प्रतीक मानले जातात, ज्यामुळे ते वाहनचालकांना अस्वस्थ करू शकतात. याउलट, हिरवा रंग मनाला शांत ठेवतो आणि सुरक्षिततेचा संदेश देतो. विशेष म्हणजे, फक्त भारतातच नाही, तर अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्येही महामार्गांवर हिरव्या किंवा काही ठिकाणी निळ्या रंगाच्या पाट्या वापरल्या जातात, कारण हा रंगही तितकाच शांत आणि प्रभावी आहे.थोडक्यात, हिरव्या रंगाच्या पाट्या केवळ सौंदर्यासाठी नाहीत, तर त्या तुमच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी खास निवडल्या गेल्या आहेत!




