गेल्या ४० दिवसांपासून सुरू असलेल्या इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक पातळीवर तणाव निर्माण झाला होता. या परिस्थितीत अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी संपूर्ण तणाव अद्याप पूर्णपणे निवळलेला नाही.
या संघर्षाचा थेट परिणाम इंधन पुरवठ्यावर झाला होता. विशेषतः इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला होता.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ‘ग्रीन आशा’ नावाचे भारतीय तेलवाहू जहाज तब्बल १५ टन एलपीजी घेऊन मुंबई बंदरात सुरक्षितपणे पोहोचले आहे. हे जहाज होर्मुझ सामुद्रधुनी पार करून भारतात दाखल झाले, ही मोठी दिलासा देणारी बाब मानली जात आहे.
जर हा युद्धविराम कायम राहिला, तर आगामी काळात जागतिक ऊर्जा पुरवठा पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




