Summer Baby Care : उन्हाळ्यात बाळांची घ्या खास काळजी ; उष्णतेपासून संरक्षणासाठी सोप्या टिप्स

spot_img

उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा परिणाम मोठ्यांइतकाच लहान बाळांवरही होतो. उष्णतेमुळे डिहायड्रेशन, घामोळे आणि ताप यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र, बाळांना त्यांचा त्रास सांगता येत नसल्यामुळे पालकांनी अधिक सतर्क राहणं गरजेचं असतं. ६ महिन्यांखालील बाळांसाठी आईचं दूध हेच पूर्ण आहार असतो. तर ६ महिन्यांवरील बाळांना थोड्या प्रमाणात पाणी, नारळपाणी किंवा फळांचे रस देऊ शकता.

उन्हाळ्यात बाळांना हलके, सैल आणि कापसाचे कपडे घालावेत. घट्ट आणि सिंथेटिक कपड्यांमुळे घाम वाढतो आणि त्वचेवर त्रास होऊ शकतो. तसेच, दुपारच्या कडक उन्हात (१२ ते ४) बाळाला बाहेर नेणं टाळावं. गरज असल्यास टोपी, छत्री किंवा कापडाचा वापर करून संरक्षण करावं.

घरात पंखा किंवा एसी वापरताना थंड हवा थेट बाळावर येणार नाही याची काळजी घ्या. दिवसातून एक-दोन वेळा कोमट पाण्याने अंघोळ घातल्याने बाळाला आराम मिळतो आणि घामोळे कमी होतात. त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

मोठ्या बाळांना हलकं आणि पचायला सोपं अन्न द्यावं, जसं की खिचडी, फळं किंवा दही. जर बाळ सतत रडत असेल, तोंड कोरडं वाटत असेल किंवा लघवी कमी होत असेल, तर ही डिहायड्रेशनची लक्षणं असू शकतात. अशा वेळी विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ