Pune Crime : लाखो रुपयांचे तांब्याचे हांडे चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला अटक

spot_img

ओतूर,प्रतिनिधी : रमेश तांबे

जुन्नर तालुक्यात भांड्यांच्या व्यवसायिकाच्या गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने तीन महिलांना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी १,३७,५०० रुपये किंमतीचे ५५ तांब्याचे हांडे जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे सारिका बबन मकवाने, अंजली सुरज वाघमारे आणि सुरेखा राजू वालेकर अशी असून त्या सर्व पंचलिंग वस्ती, जुन्नर येथील रहिवासी आहेत.

या प्रकरणी आनंद हेमंत सासवडे (रा. महाजन आळी, जुन्नर) यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या भांड्यांच्या गोडाऊनमधून २० मार्चच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी एकूण ९० तांब्याचे हांडे चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काही महिलांकडून हांडे चोरीला नेत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी कुरण फाटा येथे सापळा रचून संशयित महिलांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरीची कबुली दिली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्लसो, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली. तसेच यात जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक किरण अवचर, सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार दीपक साबळे,पोलीस हवालदार राजू मोमिन,संदीप वारे,अक्षय नवले, निलेश सुपेकर, महिला पोलीस हवालदार नंदा कदम, सुजाता कदम, हवालदार सागर हिले यांनी कामगिरी बजावली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ