spot_img

Chhaya Kadam : लापता लेडीज’मधील अभिनयाने मराठमोळ्या अभिनेत्रीने जिंकली शाहरुख खानची मिठी

spot_img

माझी दोन स्वप्नं पूर्ण फिल्मफेअर पुरस्कारासह छाया कदम यांची स्वप्नपूर्ती

मराठी मातीतून उगम पावलेली आणि आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे छाया कदम (Chhaya Kadam). मोठ्या स्टार्सच्या गर्दीतही त्यांचा सहज, पण प्रभावी अभिनय नेहमीच वेगळा ठरतो. छोट्या-मोठ्या भूमिकांमधून कथेला खोली देणाऱ्या छाया यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे, मुख्य भूमिका न साकारताही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव गाजवलं आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या 70व्या हिंदी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात छाया कदम यांनी सर्वांचं लक्ष वेधलं.

‘लापता लेडीज’ या चित्रपटातील त्यांच्या दमदार भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्यांना बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, ज्यामुळे हा क्षण त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. पुरस्कार स्वीकारताना छाया यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं, “हा माझ्यासाठी पहिला हिंदी फिल्मफेअर पुरस्कार आहे, आणि त्याचबरोबर माझी दोन स्वप्नं पूर्ण झाली शाहरुख खान यांच्याकडून मिठी मिळणं आणि ही काळी पुतळी घरी घेऊन जाणं. ‘लापता लेडीज’ने मला एक सुंदर कथा सांगण्याची संधी दिली, जी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडली.

दिग्दर्शिका किरण राव, संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचा मी मनापासून आभारी आहे. हा पुरस्कार मी त्या प्रत्येक स्त्रीला समर्पित करते, जी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कोणत्याही मर्यादांना न जुमानता पुढे जाते.”छाया कदम यांनी ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘न्यूड’, ‘जुड’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘लापता लेडीज’ आणि ‘मेडगाव एक्सप्रेस’ यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. याशिवाय, ‘हुतात्मा’ या वेब सीरिज आणि ‘मेरे साई’ या टीव्ही मालिकेतही त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे, ‘न्यूड’ या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. येणाऱ्या काळातही छाया कदम आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणार, यात शंका नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ