Cup Bashi Marathi Movie Poster Launch : ‘कप बशी’मधून सासू-सुनेच्या नात्याचा हटके प्रवास; 5 जूनला ​​प्रदर्शित होणार

spot_img

सू-सुनेचं नातं नेहमीच भावनांनी भरलेलं आणि रंगतदार असतं. याच नात्याची वेगळी बाजू उलगडणारा ‘कप बशी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक वैभव चिंचळकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा सिनेमा 5 जून रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर समोर आलं असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

सुकल्प चित्रच्या निर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटाचे निर्माते कल्पक सदानंद जोशी, तर निलेश राठी आहेत. यांनी प्रस्तुतीची जबाबदारी सांभाळली आहे. कथा, पटकथा आणि संवाद चेतन सैंदाणे यांनी केले आहेत. निर्मिती सावंत, पूजा सावंत, ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, आनंद इंगळे
यांसह अनेक दमदार कलाकार झळकणार आहेत.

या चित्रपटाची कथा अरुण आणि अरुणा या दांपत्याभोवती फिरते, जे आपल्या मुलासाठी योग्य वधू शोधत असतात. मात्र, अरुणाच्या अध्यात्मिक गुरूंनी सुनेबाबत काही खास अटी घातलेल्या असतात. त्या अटींना साजेशी मुलगी मिळते का? लग्न जुळतं का? याभोवती चित्रपटाची रंजक कथा रंगते.

परंपरा, श्रद्धा आणि आधुनिक विचार यांच्यातील संघर्ष हलक्याफुलक्या आणि मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात आला आहे. गीतकार गुरु ठाकूर यांच्या गीतांना ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंह यांचं संगीत लाभलं आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ कथानकामुळेच नाही तर संगीत आणि अभिनयामुळेही प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ