Narhari Zirwal Viral Video : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा ‘तो’ व्हिडिओ कुणी केला रेकॉर्ड? बेडरूममधील व्हायरल क्लिपने राजकीय वर्तुळात खळबळ

spot_img

अनैतिक संबंधांचा दावा आणि खंडणीचा गुन्हा; झिरवाळ यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, धक्कादायक खुलासे समोर

अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. शासकीय निवासस्थानातील बेडरूममध्ये चित्रित झालेल्या या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच, आता हा व्हिडिओ नक्की कुणी रेकॉर्ड केला याचा मोठा खुलासा झाला आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या पवन यादव या तृतीयपंथी व्यक्तीच्या भावाने, रवी यादव याने स्पष्ट केले आहे की, हा व्हिडिओ स्वतः पवननेच शूट केला होता. रवी यादवने पुढे गंभीर आरोप करत म्हटले की, शासकीय तृतीयपंथी बोर्डात पद मिळवण्याच्या उद्देशाने दोघांचे संबंध आले होते आणि झिरवाळ यांनी पवनसोबत अनेकदा अनैतिक संबंध ठेवले आहेत.

दुसरीकडे, या व्हिडिओची पूर्वकल्पना असल्याने नरहरी झिरवाळ यांनी आधीच सावध पवित्रा घेतला होता. त्यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, पवन यादव विरुद्ध मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. झिरवाळ यांच्या मते, त्यांना अडकवण्यासाठी आणि पैशांची मागणी करण्यासाठी हे जाळे विणले गेले आहे. मात्र, या प्रकरणातील गंभीर आरोप आणि व्हायरल व्हिडिओमुळे विरोधकांनी आता थेट झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. सत्तेतील एका जबाबदार मंत्र्याचा असा व्हिडिओ समोर आल्याने सरकारची मोठी नाचक्की होत असून, या प्रकरणाचा तपास आता कोणत्या दिशेला वळतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ