Sanjay Raut : ठाकरेंच्या ‘टायगर’ बैठकीत खडाजंगी? प्रियंका चतुर्वेदींच्या नाराजीवर संजय राऊतांचे मोठे स्पष्टीकरण

spot_img

राज्यसभेच्या जागेवरून शिवसेनेत धुसफूस असल्याची चर्चा; राऊतांनी अफवांचे पीक फेटाळून लावत पक्षांतर्गत वादावर दिला पडदा

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेनेच्या खासदार बैठकीत ‘ऑपरेशन टायगर’ पेक्षा अंतर्गत नाराजीचीच जास्त चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) राज्यसभेची जागा सोडल्याने खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट संजय राऊतांसमोरच आपला संताप व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली. या बैठकीत झालेल्या वादावादीच्या बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती, मात्र आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी या सर्व चर्चांना ‘निव्वळ अफवा’ ठरवले. “मी जन्मापासून या पक्षात आहे, विचार केल्याशिवाय आम्ही पावले टाकत नाही,” असे म्हणत त्यांनी अंतर्गत वादावर स्पष्टपणे पडदा टाकला.

यावेळी राऊतांनी इतर ज्वलंत विषयांवरही भाष्य केले. अशोक खरात प्रकरणात तपास सुरू असताना संशय व्यक्त करणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री आणि पोलिसांना शांतपणे काम करू देण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, अजित पवार गटाने राष्ट्रवादीवर दावा सांगण्यासाठी केलेल्या हालचालींवर भाष्य करणे त्यांनी टाळले. तसेच, आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नसल्याबद्दल त्यांनी कडाडून टीका केली. “पंतप्रधान नसतील तर अशा बैठकांना काहीच अर्थ उरत नाही,” असा टोला लगावत त्यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ