वाढत्या वयाच्या खुणा पुसून टाकण्यासाठी आणि त्वचेचा नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या त्वचेचे आरोग्य धोक्यात आले आहे. आहार आणि व्यायामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या, फिकटपणा आणि पिगमेंटेशन दिसू लागते. याचे मुख्य कारण म्हणजे त्वचेतील ‘कोलेजन’ या प्रथिनाची कमतरता. कोलेजन आपल्या त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्याचे काम करते. बाजारात मिळणारी महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा, तुम्ही केवळ ३ साहित्यांचा वापर करून घरीच एक प्रभावी कोलेजन क्रीम तयार करू शकता.
कसे बनवाल मॅजिकल कोलेजन क्रीम?
ही क्रीम तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घेण्याची गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरातील घटकांपासूनच ही क्रीम तयार होते:
२ चमचे तांदळाचे पाणी, १ मोठा चमचा कोरफड जेल (Aloe Vera Gel) आणि व्हिटॅमिन ई ची १ कॅप्सूल.
प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या. एका वाटीत हे तांदळाचे पाणी, कोरफड जेल आणि व्हिटॅमिन ई ऑईल एकत्र करा. मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगले फेटून घ्या. तुमची नैसर्गिक कोलेजन क्रीम तयार आहे!
दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून या क्रीमने चेहऱ्यावर आणि मानेवर हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर हे क्रीम त्वचेवर राहू द्या, ज्यामुळे त्वचेला खोलवर पोषण मिळेल.
केवळ क्रीम पुरेसे नाही; आहाराकडेही द्या लक्ष
त्वचा बाहेरून चमकदार दिसण्यासाठी शरीराला आतून पोषण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कोलेजनची निर्मिती वाढवण्यासाठी तुमच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करा:
- व्हिटॅमिन सी: आवळा, संत्री, लिंबू आणि पेरू यांसारखी फळे कोलेजन वाढवण्यास मदत करतात.
- अमिनो ॲसिड्स: बदाम, काजू, चिया सीड्स आणि सोयाबीन यांमधून शरीराला आवश्यक खनिजे आणि ‘गुड फॅट्स’ मिळतात.
नैसर्गिक उपाय परिणाम दाखवण्यासाठी थोडा वेळ घेतात, त्यामुळे सातत्य ठेवल्यास तुम्हाला तुमची त्वचा पूर्वीपेक्षा अधिक मऊ, घट्ट आणि चमकदार जाणवेल.




