spot_img

Iranian Strike : मध्यपूर्वेत युद्धाची तीव्रता वाढली,अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षाचा दहावा दिवस

spot_img

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाने अधिक गंभीर वळण घेतले असून इस्रायल, इराण आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीला आज दहावा दिवस पूर्ण झाला आहे. या युद्धात आतापर्यंत सुमारे 1700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक जखमी झाले आहेत. सतत सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे अनेकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागत आहे. दोन्ही देश एकमेकांच्या लष्करी तळांसोबत नागरी भागांनाही लक्ष्य करत असल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान होत आहे. या दरम्यान इस्रायलने हिजबुल्ला या इराण समर्थक संघटनेवर लेबनॉन मध्येही हल्ले सुरू ठेवले आहेत. त्यामुळे संपूर्ण आखाती प्रदेशात भीतीचे वातावरण कायम आहे.

दुसरीकडे, बहरीन मधील सरकारी तेल कंपनी बापको एनर्जीजने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे सांगत त्यांच्या कामकाजावर “फोर्स मेज्युअर” जाहीर केले आहे. म्हणजेच युद्धामुळे तेल पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास कंपनी त्यासाठी जबाबदार राहणार नाही. सित्रा परिसरातील तेल शुद्धीकरण केंद्राजवळ इराणी ड्रोन हल्ल्यानंतर दाट धूर दिसल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर बहरीनच्या गृह मंत्रालयाने देशभर सायरन वाजवत नागरिकांना आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी शांत राहून जवळच्या सुरक्षित आश्रयस्थानी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, दुबईमध्ये अडकलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुबईहून सुमारे 330 इस्रायली नागरिकांना घेऊन जाणारे पहिले बचाव विमान बेन गुरियन विमानतळ येथे सुरक्षित उतरले आहे. आणखी एक विमान येण्याची अपेक्षा असून काही नागरिकांना Athensमार्गे हलवले जाणार आहे.

युद्धामुळे जागतिक तेल बाजारावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तेलाच्या वाढत्या किमती आणि संभाव्य ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर G7 देशांचे अर्थमंत्री आपत्कालीन बैठक घेणार आहेत. या बैठकीत आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या समन्वयाने आपत्कालीन तेल साठा बाजारात सोडण्याच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, असे केल्यास जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा वाढून किमतींवरील दबाव कमी होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ