spot_img

International News : मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतावर परिणाम? ‘मेक इन इंडिया’वर अमेरिका-चीनचे आक्षेप

spot_img

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या घडामोडींचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही दिसू लागला आहे. युरोपियन देशांमध्ये नैसर्गिक वायूच्या किमतीत सुमारे 27 टक्क्यांची वाढ झाल्याचे वृत्त आहे. जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन यांनी अमेरिकेला पाठिंबा दिल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे, तर इराणने विविध देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा संघर्ष तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने जातोय का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला आणि तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल करणारा भारत आता अमेरिका आणि चीनच्या आक्षेपांना सामोरा जात आहे. भारत सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडिया मोहिमेचा उद्देश देशाला जागतिक उत्पादन केंद्र बनवणे हा आहे. त्याचाच भाग म्हणून 2020 मध्ये उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन (PLI) योजना सुरू करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्मिती, सोलर उपकरणांसह 14 क्षेत्रांसाठी लागू असलेल्या या योजनेसाठी सुमारे 21 अब्ज डॉलरची तरतूद करण्यात आली आहे.

विशेषतः सोलर क्षेत्रात या योजनेचा प्रभाव दिसून आल्याने अमेरिकेने भारतीय सोलर उत्पादनांवर 126 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, चीनने भारताच्या व्यापार धोरणाविरोधात जागतिक व्यापार संघटना (WTO) कडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर या वादाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. एकूणच, जागतिक संघर्ष आणि व्यापार धोरणांवरील मतभेद यामुळे भारताच्या आर्थिक धोरणांपुढे नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ