Singer Kumar Sanus Son Tested Corona Positive : ‘चीन से आया मेरा दोस्त…’ रुग्णालयातून जान सानूचा चाहत्यांना संदेश; कोरोनाची लागण झाल्यानंतरही दाखवलेलं धाडस चर्चेत!

spot_img

देशात कोरोनाचा आलेख पुन्हा वाढता; प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या मुलाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दिली प्रकृतीची माहिती.

बॉलिवूडचे दिग्गज गायक कुमार सानू यांचा मुलगा आणि स्वतः गायक असलेला जान सानू याला कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी, १२ जुलै रोजी त्याने स्वतः सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना ही माहिती दिली. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विशेष म्हणजे, रुग्णालयात उपचार घेत असतानाही जानचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला. त्याने बेडवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला त्याने “चीन से आया मेरा दोस्त, कोविड को सलाम करो” असं उपरोधिक पण हलकंफुलकं कॅप्शन दिलं आहे. कठीण परिस्थितीतही त्याने ठेवलेलं हे मानसिक धैर्य पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला असून, त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

जान सानू हा कुमार सानू आणि त्यांची पहिली पत्नी रीटा भट्टाचार्य यांचा मुलगा आहे. कुमार सानू आणि रीटा यांचा १९९४ मध्ये घटस्फोट झाला होता. जान जेव्हा ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता, तेव्हा त्याने आपल्या कौटुंबिक आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते. “माझी आई जेव्हा ६ महिन्यांची गरोदर होती, तेव्हा वडिलांनी तिला सोडलं. त्यांनी माझ्यासाठी किंवा आईसाठी कधीच काही केलं नाही. उलट, मी कुमार सानूचा मुलगा असल्यामुळेच इंडस्ट्रीत अनेकांनी मला काम नाकारलं. मला फक्त माझ्या आईनेच लहानाचं मोठं केलं,” असं जाननं अत्यंत भावूक होत सांगितलं होतं.

एकीकडे मुंबईत जान सानूला संसर्ग झाला असतानाच, देशातील इतर भागांतही रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आंध्र प्रदेशात कोरोनाचे नवीन ८ रुग्ण आढळले असून, दुर्दैवाने त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या या विषाणूने आतापर्यंत अल्फा, बीटा, डेल्टा आणि ओमिक्रॉन यांसारखी अनेक रूपं बदलली आहेत. भारतात ३० जानेवारी २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता आणि आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि वेळीच उपचार घेण्यासाठी खालील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका:

  • चव आणि वास घेण्याची क्षमता जाणं.
  • श्वास घेण्यास अडचण निर्माण होणे.
  • सर्दी, खोकला आणि ताप येणे.
  • पोट खराब होणं किंवा डायरिया (अतिसार) होणं.

अशी लक्षणे आढळल्यास स्वतःला आयसोलेट करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ