ओतूर,प्रतिनिधी:रमेश तांबे
जुन्नर येथून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पोलीसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून एक लाख दहा हजार रूपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केली आहे.
समर्थ बाळासाहेब ढगे वय १८ रा.५२ गल्ली ओतूर, ता.जुन्नर जि.पुणे,अथर्व सचिन साबळे वय २० रा.ओतूर, ता.जुन्नर, जि.पुणे अशी दुचाकी चोरणाऱ्या आरोपींची नावे आहेत. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर अधिक माहिती देताना म्हणाले की,जुन्नर ( परीटवाडी ) येथून शाईन कंपनीची मोटारसायल चोरीला गेली होती. तसेच दि.२४ एप्रिल रोजी जुन्नर शहरातून एक बुलेट गाडी चोरीस गेली होती. सदर गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास करत असताना दोन्ही गाड्या ज्या ठिकाणाहून चोरीस गेलेल्या होत्या त्या ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासले असता दोन्ही गाड्या ह्या चोरी करून ओतूर शहराच्या च्या बाजूला गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज वरून लक्षात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने ओतूर भागात सीसीटीव्ही फुटेज वरून गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती घेतली असता समर्थ बाळासाहेब ढगे वय १८ रा.५२ गल्ली ओतूर, ता.जुन्नर जि.पुणे,अथर्व सचिन साबळे वय २० रा.ओतूर, ता.जुन्नर, जि. पुणे हे बिना नंबर प्लेटची शाईन मोटरसायकल वापरत असल्याचे समजले.दि.७ मे रोजी वरील दोन्ही इसम हे कुमशेत फाटा जुन्नर येथे येणार असल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाला बातमीदारा मार्फत समजले. सदर ठिकाणी गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून, दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस गेलेल्या दोन्ही मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी जुन्नर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. सदरची कार्यवाही ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिप गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर,पोलीस निरिक्षक किरण अवचर,सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शेलार,सहाय्यक फौजदार दिपक साबळे, पोलीस हवालदार राजू मोमिन,पोलीस हवालदार संदीप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले,पोलीस शिपाई अभिमन्यू मोटे यांनी केली आहे.




