Mumbai Crime : मुंबईत बनावट दाखल्यांचे रॅकेट उघड; डिजिटल सहीचा गैरवापर करून हजारो प्रमाणपत्रे जारी केल्याचा आरोप

spot_img

मुंबईत वारसा, अधिवास, उत्पन्न आणि जन्मदाखल्यांशी संबंधित मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून काही महसूल अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षऱ्यांचा गैरवापर करून ‘आपले सरकार’ पोर्टल आणि सेतू केंद्रांच्या माध्यमातून अल्पावधीत मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्रे जारी करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी महसूल विभागाने विशेष तपास पथके नियुक्त केली आहेत. तपासादरम्यान एफ साऊथ आणि एफ नॉर्थ विभागातील 1,023 प्रमाणपत्रांची छाननी करण्यात आली. त्यापैकी जवळपास निम्म्या दाखल्यांची पडताळणी पूर्ण झाली असून 221 प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांचा अभाव आढळून आला आहे. त्यामुळे या दाखल्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या एमआरए मार्ग पोलीस या संपूर्ण घोटाळ्याचा तपास करत असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ