Crime News : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला झोपेतच दिला ‘विजेचा शॉक’; पत्नी आणि प्रियकराचा खळबळजनक कट

spot_img

मध्यरात्री अ‍ॅल्युमिनियमच्या तारेने पतीला संपवण्याचा प्रयत्न; कळंब तालुक्यातील धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी पत्नीसह प्रियकराला ठोकल्या बेड्या

माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पंगडी येथे समोर आली आहे. आपल्या अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरणारं कुंकूच पुसण्याचा प्रयत्न एका पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने केला. पती गजानन मोरे (वय ३८) हे गाढ झोपेत असताना, पत्नी कवडी मोरे हिने प्रियकर विष्णू आत्राम याच्या चिथावणीवरून त्यांना विजेचा तीव्र शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात गजानन मोरे हे गंभीर जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.

या घटनेचा कट अत्यंत क्रूर पद्धतीने रचण्यात आला होता. आरोपी पत्नीने विद्युत वायरला अ‍ॅल्युमिनियमची तार जोडून, मध्यरात्री गजानन यांच्या अंगाला ती लावून शॉक दिला. यामुळे त्यांच्या दोन्ही हातांच्या दंडाला गंभीर जखमा झाल्या आहेत. ८ मे रोजी या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर कळंब पोलिसांनी तातडीने कारवाई करत पत्नी कवडी आणि तिचा प्रियकर विष्णू या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. समाजात या घटनेमुळे संतापाची लाट असून, पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ