CM Fadnavis : ‘टेक-वारी 2.0’चा भव्य शुभारंभ; मंत्रालयात तंत्रज्ञान शिक्षण सप्ताहाला सुरुवात

spot_img

टेक-वारी 2.0 या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात उत्साहात पार पडला. सामान्य प्रशासन विभाग तसेच इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा तंत्रज्ञान शिक्षण सप्ताह ४ ते ८ मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

राज्य प्रशासन अधिक सक्षम, तंत्रज्ञानस्नेही आणि भविष्योन्मुख करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे राज्यातील सुमारे १० लाख सरकारी कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशासन, आरोग्य, डिजिटल गव्हर्नन्स आणि सांस्कृतिक मूल्यांचा समन्वय साधत शासनाच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा राधा चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्याच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात तबलावादक नीलेश परब यांच्या ‘तालरंग: लय आणि सांघिक कार्याचा प्रवास’ या विशेष सादरीकरणाने झाली. त्यानंतर डिजिटल गव्हर्नन्स आणि एआयच्या बदलत्या स्वरूपावर विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये अमिताभ कांत, सदानंद दाते आणि डॉ. विवेक राघवन यांनी डिजिटल प्रशासनातील नव्या संधींवर भाष्य केले.

याशिवाय मानसिक आरोग्य, मेंदूची कार्यक्षमता आणि सर्वांगीण विकास यावरही विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे ‘टेक-वारी 2.0’ हा केवळ तंत्रज्ञानाचा कार्यक्रम न राहता प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ