Abhijeet Dipke : NEET आंदोलनाचे नेते अभिजीत दिपके प्रकृती अस्वास्थ्यामुळे जंतरमंतरवरून झाले दूर; समर्थकांची मागितली माफी!

spot_img

सततच्या ताप आणि शारीरिक त्रासामुळे पेनकिलर घेऊन करत होते आंदोलन; सायंकाळपर्यंत पुन्हा आंदोलनात परतणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

NEET परीक्षा पेपरफुटी आणि अनियमिततेच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या सुमारे एका महिन्यापासून ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने अत्यंत आक्रमक आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी समोर करत या आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते अभिजीत दिपके यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची व मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या 20 जूनपासून सलग जंतरमंतरवर उपोषण व आंदोलनात सक्रिय असणारे अभिजीत दिपके यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या मैदान सोडावे लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून तीव्र ताप आणि शरीरात प्रचंड त्रास होत असतानाही ते पेनकिलर घेऊन आंदोलनात टिकून होते, मात्र तब्येत अतिशय खालावल्यामुळे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत समर्थकांकडे विश्रांतीसाठी परवानगी मागितली आहे आणि आंदोलनात सध्या उपस्थित राहू शकणार नसल्याबद्दल दिलगीर व्यक्त केली आहे.

दरम्यान, सोमवारीच अभिजीत दिपके यांच्या मार्गदर्शनाखाली संसदेवर एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता, ज्याला पोलिसांनी रोखल्यानंतर परिस्थिती चिघळली आणि लाठीचार्जची घटना घडली. या संघर्षानंतर आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर परतले होते. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक अद्यापही ठाम असले, तरी प्रकृतीच्या कारणास्तव अभिजीत दिपके तात्पुरते आंदोलनापासून बाजूला झाले आहेत. असे असले तरी, प्रकृती सुधारताच सायंकाळपर्यंत पुन्हा आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले असून, सध्या त्यांची ही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ