spot_img

Pune News : पुण्यातील वरंधा घाटात भीषण अपघात,मतदानासाठी मुंबईहून आलेले चौघे थेट दरीत

spot_img

पुण्याच्या भोर-महाड मार्गावरील प्रसिद्ध वरंधा घाटात भीषण अपघात झाला आहे. शिरगाव (Shirgaon) गावच्या हद्दीत एक वॅगनआर कार सुमारे १२० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, कार दरीत कोसळत असतानाच त्यातील चार प्रवाशांनी प्रसंगावधान राखून बाहेर उड्या मारल्याने मोठा अनर्थ टळला. ही कार महाडहून भोरच्या दिशेने येत होती. घाटातील शिरगाव गावच्या हद्दीत एका धोकादायक वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दरीत कोसळली. कार दरीत कोसळत असल्याचं लक्षात येताच, कारमधील चौघांनीही क्षणाचाही विलंब न लावता बाहेर उड्या मारल्या. यामुळे चौघांचा जीव वाचला आहे. मात्र चौघेही किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघातातील प्रवासी हे मूळचे महाड तालुक्यातील रहिवासी असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान करण्यासाठी ते मुंबईहून गावाला आले होते. मतदान पार पडल्यानंतर ते पुन्हा मुंबईकडे परत जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. अपघाताचा आवाज ऐकताच शिरगाव येथील स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरीत उतरून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना धीर देत जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ