spot_img

Gautam Gambhir : पराभवाचा खापर एकट्या गंभीरवरच का? अखेर गौतम गंभीरांनी मौन सोडलं

spot_img

शशी थरुर यांच्या ट्विटला उत्तर देत गंभीरांनी अप्रत्यक्षपणे टीकाकारांना दिला सडेतोड संदेश

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेटमधील प्रत्येक वाद, अपयश आणि निर्णयांचा केंद्रबिंदू एकच नाव ठरत आहे. गौतम गंभीर (Gautam Gambhir). रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची कसोटी क्रिकेटमधील निवृत्ती, देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची सक्ती, तसेच कसोटी आणि वनडेमधील खराब कामगिरी या सगळ्याच गोष्टींसाठी गंभीर यांना जबाबदार धरलं जात आहे. संघ जिंकला तर खेळाडू हिरो, पण हरला तर कोच खलनायक असं चित्र सध्या उभं केलं जात असल्याचं दिसतं.

खरंतर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. मैदानावर अकरा खेळाडू उतरतात आणि निर्णय हे कॅप्टन व कोच यांच्या सामंजस्याने घेतले जातात. तरीही पराभवानंतर बोट मात्र सातत्याने गंभीरांकडेच दाखवलं जातं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी गंभीरांचे मतभेद असल्याच्या चर्चाही वारंवार रंगवल्या गेल्या.

या सगळ्या पार्श्वभूमीवर गौतम गंभीर यांनी पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे या आरोपांवर भाष्य केलं आहे. काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी केलेल्या एका ट्विटला गंभीर यांनी उत्तर दिलं. थरुर यांनी नागपूरमध्ये झालेल्या भेटीनंतर गंभीर यांच्या कामाचं कौतुक करत, टीम इंडियाचा कोच असणं हे पंतप्रधानांनंतरचं सर्वात कठीण काम असल्याचं म्हटलं होतं. कोट्यवधी लोकांकडून रोज होणाऱ्या टीकेला न घाबरता गंभीर शांतपणे आपलं काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

थरुर यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना गंभीर म्हणाले की, “जेव्हा सगळ्या चर्चा थांबतील, तेव्हा कोचला अमर्याद अधिकार असल्याचं जे सांगितलं जातं, त्यामागचं खरं सत्य आणि तर्क लोकांसमोर येईल. मला याचं आश्चर्य वाटतं की मला माझ्याच लोकांविरोधात उभं केलं जात आहे, जे प्रत्यक्षात सर्वोत्तम आहेत.”

गंभीर यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नसतानाही, त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे. नेमका इशारा कोणाकडे होता? माध्यमं, खेळाडू की क्रिकेट व्यवस्थापन? सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ