spot_img

Archana Puran Singh : अर्चना पुरण सिंग असाध्य आजाराशी देतेय झुंज

spot_img

आईचा हात कधीच पूर्वीसारखा होणार नाही’ — मुलगा आयुष्मानने केला भावनिक खुलासा

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वात आपल्या खळखळत्या हास्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री अर्चना पुरण सिंग सध्या एका गंभीर आरोग्य समस्येमुळे चर्चेत आहेत. ‘द कपिल शर्मा शो’मधील त्यांच्या विनोदी उपस्थितीमागे सुरू असलेली वेदनादायी झुंज आता समोर आली आहे. खुद्द अर्चनाच्या मुलाने तिच्या आजाराबाबत भावनिक खुलासा केला आहे.

अर्चना पुरण सिंग आपल्या यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांशी संवाद साधत असते. तिची दोन्ही मुलेही त्यांच्या आयुष्यातील अनुभव खुलेपणाने शेअर करतात. याच दरम्यान अर्चनाचा मुलगा आयुष्मान याने आईच्या प्रकृतीविषयी बोलताना सांगितले की, अर्चनाला CRPS (कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम) या दुर्मिळ आणि असाध्य आजाराने ग्रासले आहे.

आयुष्मान म्हणाला, “मला माझ्या आईचा खूप अभिमान आहे. मागचं वर्ष तिच्यासाठी अत्यंत कठीण होतं. तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं आणि त्यानंतर तिला CRPS झाला. या आजारामुळे तिचा हात आता कधीच पूर्वीसारखा होणार नाही.”

या गंभीर परिस्थितीतही अर्चनाने काम थांबवलं नाही, हे सांगताना आयुष्मान भावूक झाला. “इतक्या वेदना असूनही तिने 2-3 सिनेमांमध्ये काम केलं, एक वेब सीरिज शूट केली. एक महिना तर सलग 30 दिवस शूटिंग केलं, पण तिने कधीही तक्रार केली नाही. वयाच्या 60 व्या वर्षी यूट्यूब चॅनल सुरू करून नवीन गोष्टी शिकण्याचं धाडस तिने दाखवलं,” असे तो म्हणाला. मुलाच्या या कौतुकाने अर्चनाच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

अर्चना पुरण सिंगने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. ‘जलवा’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘कुछ कुछ होता है’, ‘मोहब्बतें’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमधील तिच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. टेलिव्हिजनवरही ‘श्रीमान श्रीमती’, ‘जाने भी दो पारो’, ‘जुनून’ यांसारख्या मालिकांमधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

आजही अर्चना सोशल मीडियावर सक्रिय असून, आपल्या कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या सकारात्मक वृत्तीमुळे आणि जिद्दीमुळे चाहते तिला केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणूनही पाहत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ