spot_img

Tara Sutaria Veer Pahariya Breakup : तारा सुतारिया–वीर पहारिया यांचा ब्रेकअप, एपी ढिल्लोच्या कॉन्सर्टमधील व्हिडीओ ठरला ब्रेकअपच्या चर्चेचा केंद्रबिंदू?

spot_img

डेटिंगचे काही महिने पूर्ण न होताच ब्रेकअप, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या घटनेला कारणीभूत मानले जात आहे

मुंबईतील एपी ढिल्लोच्या कॉन्सर्टमध्ये घडलेल्या घटनेनंतर अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutariya) आणि वीर पहारिया (Veer Paharaiya) यांची जोडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली होती. मात्र, डेटिंगचे काही महिने पूर्ण होताच दोघांचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘फिल्मफेअर’च्या माहितीनुसार, तारा आणि वीरने हा निर्णय सहमतीने घेतला आहे, परंतु नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एपी ढिल्लोच्या (AP Dhillon) कॉन्सर्टमधील व्हिडीओनंतरच ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले आहे. कॉन्सर्टमध्ये तारा आणि एपी स्टेजवर दिसले—तारा एपीला मिठी मारताना आणि गालावर किस करताना दिसली, तर एपीनेही प्रत्युत्तर दिले. ह्या क्षणांमध्ये वीर पहारियाचा चेहरा ताणलेला दिसल्याचे व्हिडीओतून स्पष्ट होते. हा व्हिडीओ अनेक मीम्ससाठी कारणीभूत ठरला.

ताराने नंतर स्पष्ट केले की, व्हिडीओ फेक आहे. तारा आणि वीरचा मित्र ऑरी यांनीही इन्स्टाग्रामवर कॉन्सर्टमधील ‘लाइव्ह’ व्हिडीओ शेअर करून ट्रोलर्सना उत्तर दिले. तारा यांनी असा आरोप केला आहे की तिच्याविरोधात नकारात्मक पीआर मोहीम राबवली जात होती, ज्यामध्ये अपमानास्पद कॅप्शन आणि चर्चा निर्माण करण्यासाठी शेकडो कंटेंट क्रिएटर्स आणि मीम पेजेसचा वापर केला गेला. तारा यांनी या परिस्थितीला गंभीर मानले असून आपले करिअर आणि नातेसंबंध उद्ध्वस्त करण्याचा आरोप केला.

तारा सुतारिया आणि वीर पहारिया जून 2025 पासून एकमेकांना डेट करत होते. वीर पहारिया हे राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू असून ‘स्कायफोर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ