spot_img

Leather Jacket Cleaning Hacks: थंडीच्या हंगामात लेदर जॅकेट स्वच्छ ठेवण्यासाठी सोपे टिप्स

spot_img

लेदर जॅकेटची चमक टिकवण्यासाठी घरच्या घरी करता येणारी काळजीपूर्वक स्वच्छता

थंडीत उबदार राहण्यासाठी लेदर जॅकेट सर्व वयोगटातील लोक पसंतीने घालतात. परंतु बाहेरील धूळ आणि घाणेमुळे जॅकेट मळकट दिसू लागते. अशा परिस्थितीत योग्य प्रकारे स्वच्छता करणं गरजेचं असतं, कारण चुकीच्या पद्धतीने साफ केल्यास जॅकेटची गुणवत्ता कमी होऊ शकते.

सौम्य डिटर्जंट वापरा:

लेदर जॅकेट नेहमी ड्राय क्लीन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे साबणाच्या बारचा वापर टाळावा. मळकट भाग स्वच्छ करण्यासाठी सौम्य डिटर्जंट किंवा लेदर डाग रिमूव्हर वापरणं चांगलं असतं.

मऊ कापड वापरा:

जॅकेटवर धूळ असल्यास ब्रश वापरण्याऐवजी मऊ कापड वापरा. यामुळे जॅकेट फाटणार नाही आणि स्वच्छ करणे सोपे होईल.

डाग कसे काढायचे:

कठीण डाग काढण्यासाठी डिटर्जंट पावडर पाण्यात मिसळा आणि मऊ कापड भिजवून डागावर हलक्या हाताने पुसा. जास्त घासल्यास जॅकेटची चमक कमी होऊ शकते.

वॉशिंग मशीनमध्ये धुवा नका:

लेदर जॅकेट इतर कपड्यांसोबत वॉशिंग मशीनमध्ये धुणे टाळा. यामुळे लेदरमधील नैसर्गिक तेल निघून जाते आणि जॅकेटची चमक कमी होते. घरच्या घरी स्पॉट क्लीनिंग करणे हा सुरक्षित मार्ग आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ