spot_img

Walking Benefits : जिमशिवाय वजन घटवायचंय? नियमित चालणं ठरू शकतं प्रभावी उपाय

spot_img

योग्य पद्धतीने वॉकिंग केल्यास मेटाबॉलिझ्म वाढतो; तज्ज्ञांनी सांगितले वजन कमी करण्याचे 5 सोपे मार्ग

वजन वाढत असल्याने अनेकजण चिंतेत असतात. फिट राहण्यासाठी काहीजण जिममध्ये कठोर व्यायाम करतात, तर अनेकांना नियमित एक्सरसाईज करणे जमत नाही. मात्र, तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी नेहमीच कठीण व्यायामाची गरज नसते. साधे चालणे म्हणजेच वॉकिंगही योग्य प्रकारे आणि नियमित केल्यास वजन कमी करण्यास मदत करू शकते.

चालण्यामुळे केवळ कॅलरी बर्न होत नाहीत, तर शरीराचा मेटाबॉलिझ्म सुधारतो आणि पचनक्रिया सुरळीत होते. विशेष म्हणजे वॉकिंग हा असा व्यायाम आहे जो कोणत्याही वयातील व्यक्ती सहज करू शकते. यामध्ये सांधेदुखी किंवा दुखापतीचा धोका तुलनेने कमी असतो. जर चालण्याच्या सवयीमध्ये थोडे बदल केले, तर कठोर डाएट न करता देखील शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतात.

तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा शरीर जास्त कॅलरी खर्च करू लागते, तेव्हा साठलेली चरबी ऊर्जा म्हणून वापरली जाते. रोज चालण्याची सवय ठेवल्यास हळूहळू शरीराचा आकार सुधारतो आणि वजन नियंत्रणात येण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी वॉकिंगचे 5 सोपे उपाय:

जेवणानंतर थोडे चालणे फायदेशीर

जेवण झाल्यानंतर लगेच बसण्याऐवजी 10 ते 20 मिनिटे हलके चालल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि पचनास मदत होते. दिवसभरात वेगवेगळ्या वेळेला थोडेथोडे चालणे अधिक उपयुक्त ठरते.

चालताना वेग वाढवा (पॉवर वॉकिंग)

साध्या चालण्याऐवजी थोड्या वेगात चालल्यास हृदयाचे ठोके वाढतात आणि कॅलरी जास्त प्रमाणात जळतात. यामुळे गुडघ्यांवरही फारसा ताण येत नाही.

पायऱ्यांचा वापर करा

सपाट रस्त्याऐवजी जिने किंवा उतारावर चालल्यास पायांचे आणि पोटाचे स्नायू अधिक सक्रिय होतात. त्यामुळे चालण्याचा परिणाम अधिक प्रभावी ठरतो.

चालताना वेग बदलत ठेवा

काही वेळ जलद चालणे आणि नंतर थोडा वेग कमी करणे, अशा पद्धतीने चालल्यास शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया जलद होते. याला ‘इंटरव्हल वॉकिंग’ म्हणतात.

हलके वजन सोबत ठेवा

चालताना हलकी बॅग किंवा थोडे वजन घेतल्यास शरीराला अधिक मेहनत घ्यावी लागते. परिणामी कमी वेळात जास्त कॅलरी खर्च होतात. नियमितपणा आणि संयम ठेवल्यास साधे चालणेही आरोग्यासाठी आणि वजन नियंत्रणासाठी प्रभावी ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ