spot_img

Homemade Lip Balm : हिवाळ्यात ओठ फाटतायत? घरच्या घरी तयार करा नैसर्गिक लिप बाम

spot_img

रसायनमुक्त उपायांनी ओठ ठेवा मऊ, गुलाबी आणि निरोगी

हिवाळा सुरू झाला की त्वचेच्या तक्रारी वाढू लागतात. थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि याचा सर्वाधिक परिणाम ओठांवर दिसून येतो. ओठ कोरडे पडतात, फाटतात आणि त्यावर मृत त्वचा साचते. अनेकजण यासाठी बाजारात मिळणारे लिप बाम वापरतात, मात्र त्यामध्ये असलेल्या रसायनांमुळे ओठ काळवंडण्याची शक्यता असते. त्यामुळे ओठांची योग्य काळजी घेण्यासाठी घरगुती आणि नैसर्गिक लिप बाम हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

घरी लिप बाम तयार करणं अगदी सोपं आहे. गुलाबाच्या पाकळ्या, दूध आणि खोबरेल तेल यांचा वापर करून प्रभावी लिप बाम तयार करता येतो. यासाठी ६ ते ७ ताज्या गुलाबाच्या पाकळ्या थंड दुधात १० ते १५ मिनिटे भिजवून ठेवा. त्यानंतर त्या पाकळ्यांची मऊ पेस्ट करा. या पेस्टमध्ये थोडं खोबरेल तेल मिसळून मिश्रण एका छोट्या डबीत साठवा. हा लिप बाम रोज ओठांवर लावून हलक्या हाताने मसाज केल्यास ओठ मऊ राहतात आणि नैसर्गिक गुलाबीपणा येतो. गुलाबाच्या पाकळ्यांमधील अँटीऑक्सिडंट्स ओठांचा काळेपणा कमी करण्यास मदत करतात, तर दूध ओठांना पोषण देतं.

याशिवाय हळद आणि दुधापासूनही घरच्या घरी लिप बाम तयार करता येतो. थोडीशी हळद घ्या, त्यात काही थेंब दूध आणि खोबरेल तेल घालून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. या उपायामुळे फाटलेले ओठ बरे होतात आणि ओठांची कोरडेपणा कमी होतो. एकंदरीत, हिवाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा घरगुती, नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ