spot_img

Thyroid Issues In Females : थायरॉईडचा धोका पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांमध्ये ?

spot_img

थायरॉईडची समस्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसण्यामागे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या शरीरात वारंवार होणारे हार्मोनल बदल.

मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूतीनंतरचे शारीरिक बदल आणि रजोनिवृत्ती या सर्व टप्प्यांमध्ये हार्मोन्स मोठ्या प्रमाणात बदलतात, ज्याचा थायरॉईड (Thyroid) ग्रंथीवर थेट परिणाम होतो.

महिलांमध्ये ऑटोइम्यून (Autoimmune) विकारांची शक्यता पुरुषांपेक्षा अधिक असल्याने हाशिमोटो थायरॉईडायटिस किंवा ग्रेव्ह्स डिसीज सारखे विकार महिलांमध्ये जास्त दिसतात. गर्भधारणेदरम्यान थायरॉईड हार्मोन्सची गरज वाढते आणि प्रसूतीनंतर काही महिलांमध्ये पोस्ट-पार्टम थायरॉईडायटिस विकसित होतो.

भारतातील काही भागांमध्ये आयोडीनची कमतरता असल्याने महिलांमध्ये Hypothyroidismचे प्रमाण वाढते. त्यासोबतच काम, घर आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे महिलांमध्ये ताणतणावाचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे हार्मोनल imbalance होतो आणि थायरॉईडचे कार्य बिघडू शकते.

आनुवंशिकता हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे कुटुंबात थायरॉईडचा इतिहास असल्यास महिलांमध्ये हा धोका अधिक वाढतो. या सर्व कारणांमुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना थायरॉईडची समस्या जास्त प्रमाणात भेडसावते.







हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ