spot_img

Lifestyle : हास्य सांगून जातं व्यक्तिमत्त्व! हस्तरेखा शास्त्रातून समजा हसण्यामागचं गूढ

spot_img

हसण्याची पद्धत व्यक्तीचे भाग्य, स्वभाव आणि आयुष्यातील प्रवास कसा ठरवते जाणून घ्या हसण्यामागील लपलेला अर्थ

हस्तरेखा आणि चेहरावाचन शास्त्रानुसार व्यक्तीचे हसणे हे त्याच्या स्वभावाचे, विचारांचे आणि नशिबाचे प्रतिबिंब मानले जाते. कोण कसे हसते यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव किती साधा, प्रामाणिक किंवा भाग्यवान आहे हे ओळखता येते, असे मानले जाते.

दात न दाखवता हसणारे लोक – शांत, विश्वासार्ह आणि भाग्यवान

जे लोक हसताना दात दाखवत नाहीत, ते स्वभावाने खूप साधे, स्थिर आणि विश्वासू असतात, असे शास्त्रात सांगितले आहे. हे लोक इतरांचा विश्वास कधीच तोडत नाहीत आणि नात्यांमध्ये खंबीरपणे उभे राहतात. अशा व्यक्तींना भाग्यही चांगले साथ देते असे मानले जाते.

डोळे मिटून हसणारे – भावूक पण मनातल्या गोष्टी गुप्त ठेवणारे

हसताना डोळे मिटणाऱ्यांची दुनिया वेगळीच असते. हे लोक मनातील भावना सहज व्यक्त करत नाहीत. कोणतीही समस्या आली तरी ती इतरांपुढे न मांडता ते स्वतःच तोंड देतात. स्वतःच्या पद्धतीने शांतपणे जगणं यांना जास्त पसंत असतं.

हसरा चेहरा असणारे – मेहनती आणि प्रगती करणारे

नेहमी चेहऱ्यावर हलकं हसू असणारे लोक सकारात्मक ऊर्जा बाळगतात. शास्त्रानुसार असे लोक आयुष्यात चांगली प्रगती करतात. मेहनतीच्या जोरावर हे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात आणि सुखी जीवन जगतात.

स्त्रियांच्या हास्याचा अर्थ

दात न दाखवता मोकळेपणाने हसणाऱ्या स्त्रिया – अतिशय भाग्यवान

ज्या स्त्रिया तोंड किंचित उघडे ठेवून पण दात न दाखवता हसतात, त्या अत्यंत भाग्यवान मानल्या जातात. त्या मनातील आनंद लपवत नाहीत, पण शांतपणे परिस्थिती हाताळण्याची ताकदही त्यांच्यात असते. त्यामुळे त्या कठीण प्रसंगातून सहज बाहेर पडतात आणि आयुष्यात उत्तम प्रगती करतात.

जोरात हसणाऱ्या स्त्रिया – स्वतंत्र स्वभावाच्या

मोठ्याने, मनमोकळेपणाने हसणाऱ्या स्त्रिया स्वतःच्या नियमांवर आयुष्य जगतात. समाज काय म्हणतो याचं भान न ठेवता त्या आपलं जीवन मोकळेपणाने जगतात. काही लोक त्यांना उद्धट समजतात, पण त्या जिवंतपणा अनुभवत जगणाऱ्या असतात.

मोठ्याने हसणाऱ्या व्यक्ती – हुशार पण अडचणींना सामोरं जाणारे

ज्यांचे हसणे खूप जोरात असते, असे लोक हुशार, परिस्थितीनुसार स्वतःला बदलणारे आणि कामात तत्पर असतात. मात्र अशांना जीवनात अनेक अडथळेही येतात असे हस्तरेखा शास्त्र सांगते. प्रसंग कठीण असले तरी हे लोक त्यातून वाट काढत पुढे जातात.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ