थंडीच्या दिवसात बरेचदा हातपाय गारव्यांमुळे आखडतात, ज्यामुळे हात आणि पायाला सूज येते.
थंडीच्या दिवसात बरेचदा हातपाय गारव्यांमुळे आखडतात, ज्यामुळे हात आणि पायाला सूज येते. यासोबत तीव्र वेदना होऊ लागतात. अशातच जेव्हा तापमान कमी होते आणि दिवसभर सूर्यप्रकाश नसतो तेव्हा ही समस्या आणखी त्रास देऊ लागते. तर बोटांना सूज येण्याची अनेक कारणे आहेत, जसे की तापमानात होणारे बदल, पाण्यात जास्त काम करणे आणि अनवाणी पायांनी चालणे. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये ही समस्या अनेकांना सतावत असते. त्वचेवर लालसरपणा देखील येतो आणि जर योग्य काळजी न घेतल्यास फोड येऊ शकतात, खाज सुटणे आणि वेदना देखील होऊ शकतात.
हिवाळा (winter) सुरू होताच पाणी खूप थंड होते. यामुळे तुम्ही जेव्हा कपडे धुण्यासाठी किंवा भांडी स्वच्छ करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करता तेव्हा सूज येण्याचा धोका देखील वाढू शकतो. अशा परिस्थितीत ताबडतोब थोडं कोमट पाण्याचा वापर करण्याचा प्रयत्न करा. सूज टाळण्यासाठी योग्य रक्ताभिसरण सुरू राहणे महत्वाचे आहे. तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी दररोज बदाम किंवा ऑलिव्ह ऑइल तेलाने (Olive oil) हात व पायांना मालिश करा. कोरड्या त्वचेला सूज, वेदना आणि जखमा होण्याची शक्यता जास्त असते. याव्यतिरिक्त पायांच्या व्यायामामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहील्याने या समस्येपासून आराम मिळतो. थंडीतून थेट उबदार हवेत गेल्याने सूज येण्याचा धोका वाढतो. म्हणून जेव्हा तुमचे हातपाय खूप थंड असतात, तेव्हा ब्लँकेटमध्ये गुंडाळून बसणे चांगले.




