आपल्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःकडे पाहन विसरून गेलो आहोत. ज्यामुळे आपल्या तब्यतीवर परिणाम होत चालला आहे. आपण कमी वयातच मोठे दिसू लागलो आहोत. आपल्या व्यस्त आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे कमी वयातच केस पांढरे होत आहेत. त्यामुळे बऱ्याच स्त्रिया या केस काळे करण्यासाठी हेअर डाय लावतात. यामुळे माफक वेळेत केसांचा रंग काळा दिसतो, काही वेळेला त्याचे दुष्परिणाम देखील होतात. हेयर डाय मध्ये बरेच रासायनिक घटक आढळतात जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. टाळूवर खाज सुटणे आणि कोंडा यासारख्या समस्याचे कारण . या सर्व कारणांमुळे लक्ष हेयर डाय वापरण्यास घाबरतात पण याचे काही नैसर्गिक फायदे ही आहेत. तुम्ही नैसर्गिक रित्या केसं डाय (Homemade Hair Dye) करू शकतात.
काही घरगुती उपाय आहेत जे तुमचे पांढरे केस लपवण्यात मदत करत. आवळा पावडर, मेंदी पावडर, कॉफी पावडर, दही, काळी चहा पावडर आणि नारळाचे तेल इतकं मोजकं साहित्य लागतं. हे सर्व घटक केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हे घटक वापरून नैसर्गिक हेअर डाय तयार होतो. यानंतर एका भांड्यात २ चमचे आवळा पावडर, १ चमचा कॉफी पावडर आणि २ चमचे मेंदी पावडर घाला. आता एका भांड्यात पाणी घेऊन त्यात चहा पावडर उकळून घ्या. हे पाणी गाळून सर्व पावडरच्या मिश्रणात टाका आणि त्यात दही आणि नारळाचे तेल घाला. सर्व मिश्रण एकत्र करून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट २ ते ३ तास बाजूला राहू द्या. तुमचा नैसर्गिक हेअर डाय तयार आहे.
हा हेअर डाय पॅक लावण्यापूर्वी केस थोडेसे ओले करा आणि नंतर केसांच्या टाळूपासून ते शेवटपर्यंत डाय लावा आणि २ तास राहू द्या. नंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमचे पांढरे केस मुळांपासून काळे दिसू शकतात.




