spot_img

Flower Plant : नोव्हेंबर महिन्यात लावा ‘ही’ खास फुलझाडे

spot_img

हलका सूर्यप्रकाश आणि थोडं पाणी इतक्यातच फुलतील रंगीबेरंगी फुले, डिसेंबर ते मार्चपर्यंत घरात पसरवतील ताजेपणा

तुमच्या घरात नैसर्गिक सुगंध दरवळावा, अंगण रंगीबेरंगी दिसावं आणि वातावरणात ताजेपणा यावा असं वाटत असेल, तर नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी अगदी योग्य ठरतो. बागकाम तज्ज्ञांच्या मते, या काळात लावलेली रोपे थंडीच्या हंगामात उत्तम रुजतात आणि डिसेंबरपासून मार्चपर्यंत सतत फुलांनी बहरलेली दिसतात. थोडासा सूर्यप्रकाश आणि नियमित पाणी देणे एवढीच त्यांची साधी काळजी.

बागकाम प्रेमींसाठी नोव्हेंबर हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा काळ मानला जातो. हवामान प्रसन्न असल्याने रोपांच्या वाढीस अनुकूल परिस्थिती मिळते. त्यामुळे घर, अंगण किंवा शेत कुठेही फुलांची शोभा सहज तयार करता येते.

झेंडू : सजावट, पूजा आणि सणांमध्ये कायम मागणी असलेला झेंडू नोव्हेंबरमध्ये लावल्यानंतर फार लवकर फुलायला लागतो. कमी पाण्यातही चांगले उत्पादन देत असल्याने त्याची व्यावसायिक लागवडही मोठ्या प्रमाणावर होते.

पेटुनिया : जांभळा, गुलाबी, निळा, पांढरा अनेक रंगांत उपलब्ध असलेला पेटुनिया या हंगामात खास खुलतो. सकाळच्या हलक्या सूर्यप्रकाशात हे रोप अधिक चांगले वाढते.

गुलाब : थंड हवेत गुलाबाची नवीन कटिंग सहज रुजतात. नोव्हेंबरमध्ये लागवड केल्यास फेब्रुवारीपासून सुंदर फुलांचा हंगाम सुरू होतो. नियमित पाणी आणि खत दिल्यास त्यांची शोभा दुप्पट वाढते.

कॅलेंडुला : ‘हिवाळी सूर्यफूल’ म्हणून ओळखले जाणारे कॅलेंडुला पिवळ्या-केशरी फुलांनी बागेला जीवंतपणा देतात. दिसायला आकर्षक आणि औषधी गुणधर्मांनी युक्त असल्याने हे रोप नोव्हेंबरमध्ये लावण्यासाठी उत्तम पर्याय आहे. या हंगामात ही फुलझाडे लावली तर तुमचं घरच नाही तर मनसुद्धा सुगंधी आणि ताजेतवाने होईल!

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ