spot_img

Rahul Gandhi : ब्राझील मॉडेलनं हरियाणात 10 वेळा मतदान केल्याचा, राहुल गांधींचा गंभीर आरोप

spot_img

राहुल गांधींच्या ‘या’ दाव्याने देशभरात खळबळ

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे मतचोरीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत हरियाणातील विधानसभा निवडणुकीवरून भाजप आणि निवडणूक आयोगावर मोठा बॉम्ब फोडला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. यावेळी मोठ्या स्क्रिनवर प्रेझेंटेशन देताना राहुल गांधी यांनी सांगितलं की, “ब्राझील मॉडेलनं हरियाणात 10 वेळा मतदान केलं. हरियाणा विधानसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराने काहीतरी चुकीचं असल्याचं सांगितलं होतं. या मॉडेलनं कधी स्वीटी म्हणून तर कधी सीमा म्हणून मतदान केलंय.” तसेच, राहुल गांधी यांनी दावा केला की, हरियाणात 25 लाख मतं चोरीला गेलीत.

राहुल गांधींनी आणखी एक दावा केलाय. ते म्हणाले की, त्याच महिलेचं नाव बूथवर 223 वेळा आलं. निवडणूक आयोगानं त्या महिलेनं किती वेळा मतदान केलंय याचं उत्तर द्यावं. एका मुलीनं 10 ठिकाणी मतदान केलं. बनावट फोटो असलेले 1,24,177 मतदार होते. मतदार यादीत नऊ ठिकाणी एका महिलेनं मतदान केलं. राहुल गांधी म्हणाले की, यामागील हेतू स्पष्ट होता. भाजपला मदत करणं. ही मतदान चोरी लोकांना दिसली पाहिजे. यासाठी निवडणूक आयोगाचे आभार मानले पाहिजेत. म्हणूनच सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आलं.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, “भारतातील तरुणांनी, GenZ यांनी हे स्पष्टपणे समजून घ्यावं, अशी माझी इच्छा आहे. कारण हे तुमच्या भविष्याबद्दल आहे. मी निवडणूक आयोगावर, भारतातील लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय, म्हणून मी 100% पुराव्यांसह हे सादर करतोय. आम्हाला खात्री आहे की, काँग्रेसच्या प्रचंड विजयाचं पराभवात रूपांतर करण्यासाठी एक योजना आखण्यात आली होती. कृपया त्यांच्या (मुख्यमंत्री नायब सैनी) चेहऱ्यावरील हास्य आणि हरियाणाचे मुख्यमंत्री ज्या ‘व्यवस्थे’बद्दल बोलत आहेत, त्याकडे लक्ष द्या” अशी टीका त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ