आपल्या भारतात दिवसेंदिवस प्रदूषणाचे प्रमाण वाढत चाललं आहे. ज्यामुळे आजकाल माणसाला प्रदूषित हवेचा त्रास होतो. घराबाहेर आणि घरात दोन्हीकडे हवा शुद्ध न मिळाल्यामुळे आजार होण्याचा धोका वाढतो. अनेक लोकं शुद्ध हवेसाठी महागडे एअर प्युरिफायर खरेदी करतात. मात्र आपण विसरून गेलो आहे आपल्या आजूबाजूला नैसर्गिक एअर प्युरिफायर आहेत ज्याचा आपण वापर करावा. आजच्या काळात आपण झाडांना कापत आहोत ज्यामुळे आपल्याला प्युर ऑक्सिजन (Oxygen) मिळत नाहाये यार याकरता आपण एक उपाय करू शकतो.आपण घरातच काही इनडोअर प्लांट (Indoor Plants) ठेवले तर घरातील हवा शुद्ध होते आणि ऑक्सिजन लेव्हल हि वाढते. इतकेच नसून हे प्लांट घराची शोभा हि वाढवतात. हे वनस्पती फार खर्चिक नसतात.
स्नेक प्लांट हे एक लवचिक इनडोअर प्लांट असून ते हवा शुद्ध करण्याच्या क्षमतेसाठी ही प्रसिद्ध आहे. हे झाड फॉर्मल्डिहाइड, नायट्रोजन ऑक्साईड आणि बेंझिन यांसारखे विषारी द्रव्ये शोषून घेते आणि हे झाड रात्री जास्त प्रमाणात ऑक्सिजन सोडते आणि त्याला जास्त पाण्याची हि गरज नसते. त्यानंतर
अरेका पामला ”बटरफ्लाय पाम” असेही म्हंटलं जातं. हे झाड हवेतील कार्बन मोनोऑक्साइड आणि बेंझिनसारख्या हानिकारक विषारी द्रव्ये शोषून घेते आणि हवा शुद्ध करते. या झाडाला कमी प्रकाश आणि कमी पाणी पुरेसे असते. द पीस लिली हा एक आकर्षक आणि कमी देखभालीतील इनडोअर प्लांट आहे. हे हवेतील अमोनिया आणि व्हीओसीसारखे हानिकारक द्रव्ये शोषून घेते तर या झाडामुळे हवेची गुणवत्ता सुधारते आणि घराचे सौंदर्य हि वाढते. कोरफड हे औषधी गुणधर्मांसाठी ओळखलं जातं.कोणी चेहऱ्यासाठी तर कोणी केसांसाठी त्याचा वापर करतात. हे झाड हवा शुद्ध करते त्याबरोबरच ते आरोग्यासाठी फायदेशीर हि आहे. सूर्यप्रकाशात हे झाड वाढते आणि याला जास्त पाण्याची आवश्यकता नसते.
तर हि काही झाडे आहेत जी आपण घरात हि लावू शकतो. ज्यामुळे आपल्या शरीराराला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकते.




