spot_img

Herbal Cigarettes : हर्बल सिगारेट देखील ठरू शकते शरीराला हानिकारक? कोणते घटक असतात शरीरासाठी घातक? जाणून घ्या..

spot_img

धूम्रपान सोडण्याचा विचार करणारे अनेकजण बरेच वेगवेगळे पर्याय शोधात असतात. मग लोक हर्बल गोष्टींच्या मागे धाव घेतात. पण खरंच या सिगारेट्स तंबाखूच्या ऐवजी सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न सर्वसाम्यानं नेहमीच उद्भवतो. नाव जरी हर्बल असलं, तरी त्यामागचं सत्य जरा वेगळंच आहे. प्रत्येक वेळी हर्बल असणाऱ्या गोष्टी नेहमी चांगल्याच असतील असं नाही.

हर्बल सिगारेट (herbal cigarettes) नक्की असतं काय? या सिगारेटमध्ये तंबाखू किंवा निकोटीन नसतं. त्याऐवजी मार्शमॅलो पाने, गुलाबाच्या पाकळ्या, लाल क्लोव्हर, तुळस आणि ज्येष्ठमध यांसारख्या औषधी वनस्पती वापरल्या जातात. त्यामुळे लोकांना वाटतं की हा सुरक्षित पर्याय आहे. पण हे केवळ अर्धं सत्य आहे.

हर्बल सिगारेटमध्ये निकोटीन नसल्यामुळे व्यसन कमी होतं, परंतू त्या पूर्णपणे निरुपद्रवी नाहीत. कारण ज्या वेळी या औषधी वनस्पती जळतात, तेव्हा त्यातून कार्बन मोनोऑक्साइड, टार आणि इतर हानिकारक रसायने निर्माण होतात. काही वेळा ही प्रमाणं तंबाखू सिगारेटपेक्षाही जास्त असू शकतात.

अनेकांचा गैरसमज असतो कि नैसर्गिक गोष्टी नेहमीच आरोग्यासाठी चांगल्या असतात. पण हर्बल सिगारेटचं धूम्रपान फुफ्फुसांना नुकसान पोहोचवू शकतं असं सांगितलं जात. या धुरात असलेली रसायने फुफ्फुसाचा कर्करोग, खोकला, रोगप्रतिकारशक्ती, दमा, खोकला, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यासारख्या समस्या निर्माण करू शकतात. आजपर्यंत कोणत्याही अभ्यास हर्बल सिगारेट पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सिद्ध करू शकलेलं नाही. “सिगारेट” हा शब्द जिथे येतो, त्या ठिकाणी धूर आणि जळण हे घटक असतातच आणि हे दोन्ही शरीरासाठी घातक आहेत असं मानल जात.

तज्ञांच्या मते, कोणतीही सिगारेट मग ती हर्बल असो वा तंबाखूची आरोग्यासाठी ती धोकादायकच असते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ