spot_img

Lipsticks : लिपस्टिकमुळे होऊ शकतात हे विकार ! लिप्सटिक आहे का घातकी ?

spot_img

लिपस्टीक(Lipstick) हा महिल्यांच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा विषय बनला आहे. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करण्या महिला असो वा गृहिणी असो डेली रुटीनमध्ये त्या लिपस्टीक ओठांना लावत असतात. ददरोजच्या जीवनात हेवी मेकअप करण महिलांना शक्य होत नाही त्यामुळे नुसती लिपस्टिक लावली कि आपण उठून दिसतो. परंतू लिपस्टीक तयार करण्यासाठी वापरले जाणारे घटक किंवा केमिकल्स शरीरास हानिकारक असतात यावर वारंवार चर्चा होत असते. लिपस्टीक लावल्यानंतर ती बऱ्याचदा नकळत पोटात जात असते. तर त्यामुळे कोणते आजार उद्भवू शकतात व त्याचा काय परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो जाणून घेऊया..,

डेली रुटीन असो किंवा ऑफीस नाहीतर विविध फंकशन्स असू देत महिला लिपस्टिक लावणं पसंत करतात. असं म्हणतात लिपस्टीक तुमचे वैयक्तिमत्व खुलवत असते परंतू अनेक अभ्यासात असे आढळले आहे कि लिपस्टिक पोटात गेल्याने बरेच विकार होतात. महिला संपूर्ण जीवनात किती किलो लिपस्टीक खातात हे देखील संशोधकांनी शोधून काढले आहे.

संपूर्ण जीवनात एखाद्या महिलेच्या पोटात नकळतपणे किती लिपस्टीक जाते याचा याचा अंदाज जर आपण लावला तर तुम्हाला ती काही ग्रॅम वाटू शकते. परंतू असे नाही. वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सवर माहितीनुसार जर तुम्ही रेग्युलर लिपस्टीक लावणाऱ्या महिला आहात तर तुमच्या संपूर्ण लाईफमध्ये तु्म्ही ४ ते ९ पौंडापर्यंत लिपस्टीक खाता. लिपस्टिकचे वजन ( १.८ ते ४ किलोग्रॅम ) भरते. सर्वात महत्वाचे म्हणजे लिपस्टीक खरेदी करताना ब्रँड आणि फॉर्म्युला दोन्ही पाहून लिपस्टिक खरेदी करावी. लिपस्टीक मध्ये खतरनाक केमिकल्स मिसळलेले खूप सारे असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लिपस्टीक आणि कोणतेही ब्युटी प्रोडक्ट खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा ते पॅराबेन फ्री असावे. हे कंपाऊंड शरीरातील हार्मोनला प्रभावित करु शकते. लिपस्टीकमध्ये लेड ( शीसे), कॅडियम, पॅराबेन्स, थॅलेट्स, ब्युटाईलेटेड हायड्रॉक्सीएनिसोल (BHA) आणि ब्युटाईलेटेड हायड्रॉक्सीटोल्युईन, पेट्रोलियम, कृत्रीम रंग (artificial colors), ट्रायक्लोसन, फार्मोल्डिहाईड, टोल्युनी, या सारखे अनेक केमिकल्स असू शकतात.

जर कोणतीही लिपस्टीक वा लिप बाम लावताना ओठ जर ड्राय होऊ लागले किंवा कोणत्याही प्रकारची एलर्जी होत असेल तर ती लिपस्टिक लावणे बंद करावे आणि डर्मोटलॉजिस्टचा या संदर्भात सल्ला घ्यावा.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ