तुम्हाला माहिती आहे का ? तुम्ही घरी बियाण्यापासून कारले (Bitter gourd) उगवू शकतात. हे अगदी सोपे आहे. फक्त कुंडीत बी पेरा आणि त्यातून बाहेर पडणारी वेल वर्षभर फळ देईल. जाणून घ्या कसे ते. उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये कारल्याची (Bitter gourd)लागवड करता येते. पण, हे हिवाळ्यात अगदी टवटवीत येतात.
कारले ही एक लोकप्रिय भाजी आहे. ही भाजी औषधी गुणधर्म आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहे. त्याची चव कडू असते , परंतु साखर नियंत्रण, पचन सुधारणा आणि त्वचेची काळजी यासाठी हे खूप फायदेशीर आहे. कारल्याची लागवड भारताच्या बहुतेक सर्व भागांत, खासकरून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये केली जाते.
हि उन्हाळी आणि पावसाळ्यातील पीक आहे, जी कमी खर्चात अधिक नफा देते असत. कारले भोपळा ही वेलीसारखी वनस्पती आहे. बियाणे निवड, जमिनीची तयारी, सिंचन व खत व्यवस्थापन योग्य प्रकारे केले तर कारल्याच्या लागवडीमुळे कमी वेळात आणि चांगले उत्पादन व अधिक नफा मिळू शकतो.
कारल्याच्या लागवडीसाठी उन्हाळा व पावसाळा हे दोन्ही ऋतू योग्य आहे. कारले चिकणमातीत चांगले वाढते. मातीची पीएच पातळी 6.0 ते 7.0 दरम्यान असावी व निचरा चांगला असावा.
पेरणी करण्यापूर्वी बियासाठी काही टिप्स फोलो कराव्यात. जस कि कोमट पाण्यात किंवा गोमूत्रात 12 तास भिजवून ठेवा.बियाणे 1.5 ते 2 फूट अंतरावर पेरावीत. प्रत्येक खड्ड्यात 2-3 बिया टाकून हलक्या मातीने झाकून ठेवा आणि सुरुवातीला दर 3-4 दिवसांनी हलके सिंचन करा म्हणजे वनस्पती वाढण्यास मदत होईल. वनस्पती वाढल्यानंतर आठवड्यातून एकदा त्यांना पाणी द्या ते पुरेसे आहे. पावसाळ्यात अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच प्रत्येक गोष्टीच्या शेतीसाठी खत आणि शेण खूप महत्वाचे आहे. बियाणे पेरल्यानंतर सुमारे 55 ते 65 दिवसांनी फळे तोडण्यायोग्य होतात. तुम्ही जर घरी बियाण्यापासून कारले उगवू शकतात. हे अगदी सोपे आहे. कुंडीत बी पेरा. त्यातून बाहेर पडणारी वेल वर्षभर फळ देईल.




