जर तुम्ही डायबेटिक किंवा प्री-डायबेटिक (Diabetes) असाल तर तुम्ही हे 5 मॉर्निंग ड्रिंक्स जरूर प्यायला हवेत. ते पिण्याने, आपली रक्तातील साखर दिवसभर योग्य राहील आणि आजकालच्या खराब खाण्या पिण्याच्या सवयींमुळे मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसतंय. मधुमेह हा सायलेंट किलर आहे, जो हळूहळू संपूर्ण शरीर खाऊन टाकतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील साखर नियंत्रीत ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय हेत ते तुम्ही करू शकता. आरोग्य तज्ञांच्या मते, दररोज सकाळी 5 अँटी डायबेटिक ड्रिंक्स प्यायली पाहिजेत. या ड्रिंक्सचे सेवन केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. तुमच्या शरीरात साखरेच्या चढ-उतारांना प्रतिबंध करण्यास मदत करेल. ज्यामुळे डोळे, मूत्रपिंड, हृदय यांना नुकसान होण्यापासून वाचवता येते. जाणून घेऊया सकाळचे कोणते ड्रिंक प्यावे.
अनेक संशोधन, तज्ञ मेथीच्या दाण्यांना फायदेशीर मानतात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे मधुमेह नियंत्रित राहातो आणि मधुमेहावरील रामबाण उपाय संप्रेरकाचे उत्पादन वाढविण्याची शक्ती असते. संशोधनानुसार असे म्हणतात, मेथीचे दाणे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात. त्याचे पाणी तयार करण्यासाठी एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवून रात्रभर ठेवा आणि सकाळी उठून ते प्या.
अनेक वर्षांपासून कारल्याचा मधुमेहावर औषध म्हणून वापर केला जात आहे. कारल्यात काही संयुगे असतात, जे शरीरात ग्लुकोजचा वापर वाढवून रक्तातील साखर नियंत्रित करतात. तुम्ही सकाळी ताजे पिऊ शकता. हे रक्त स्वच्छ करण्यास मदत करत. दालचिनीच्या पोषक तत्वांमध्ये इन्सुलिनसारखे कार्य करण्याची शक्ती असते आणि त्यामुळे मधुमेहावर या मसाल्याच्या सेवनाने फायदा होतो. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा दालचिनी पावडर पाण्यात भिजवा व दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे सेवन करा. हे फळ आपल्या मेंदूसाठी, त्वचासाठी, डोळ्यांसाठी आणि केसांसाठी खूप आरोग्यदायी आहे. हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस रिड्यूसर मानले जाते, जे मधुमेह आणि रक्तातील साखर संतुलित ठेवते. दररोज सकाळी आवळ्याचा रस पिल्याने शरीराचे कार्य सुधारते.




