चुकीच्या आहारामुळे वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका; जाणून घ्या तज्ञांचा सल्ला
फॅटी लिव्हर (Fatty Liver) हा आजकाल सर्वत्र पसरलेला आजार बनला आहे, जो चुकीच्या जीवनशैली आणि आहाराच्या सवयींमुळे उद्भवतो. दरवर्षी जगभरात सुमारे 20 लाख लोक लिव्हरच्या आजारांमुळे मृत्यूमुखी पडतात. फॅटी लिव्हरचे दोन प्रकार आहेत: अल्कोहोलिक (alcoholic) आणि नॉन-अल्कोहोलिक(Non-alcoholic). यापैकी नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, याचे प्रमुख कारण आहे चुकीचा आहार, विशेषतः एक धोकादायक घटक – हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप. हा पदार्थ यकृतासाठी अत्यंत हानिकारक आहे, पण तो नेमका कशात आढळतो, हे फार कमी जणांना माहीत आहे.अमेरिकेतील थायरॉईड आणि PCOS तज्ञ डॉ. एड्रियन स्झनाजडर यांनी इंस्टाग्रामवर एका व्हिडिओद्वारे यकृताला हानी पोहोचवणाऱ्या पदार्थांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्यास तुम्ही तुमचे यकृत निरोगी ठेवू शकता.
हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप कशात आढळते?
हा धोकादायक घटक प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये आणि गोड पेयांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, जसे की:कुकीज, कँडीज, तृणधान्ये सॉफ्ट ड्रिंक्स (Soft Drinks), थंड पेये, सॉस (Sause)आणि प्रक्रिया केलेले दही (Dahi) या पदार्थांचे सेवन केल्याने फ्रुक्टोज यकृतात चरबीच्या स्वरूपात जमा होते, ज्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. त्यामुळे ताजी फळे आणि भाज्या खाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे, तर प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे गरजेचे आहे.
फ्रुक्टोज म्हणजे काय आणि ते का धोकादायक आहे?
फ्रुक्टोज हा साखरेचा एक प्रकार आहे, जो नैसर्गिकरित्या फळे आणि भाज्यांमध्ये आढळतो. पण प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये वापरले जाणारे हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप आणि सुक्रोज यकृतासाठी हानिकारक आहे. हे गोड पेये, स्नॅक्स, कँडीज, सॉस आणि थंड पेयांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. फ्रुक्टोज आतड्यांमधून शोषले जाऊन यकृतात पोहोचते, जिथे ते चरबीच्या स्वरूपात जमा होते. यामुळे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन बिघडते, पोषक तत्वांचे शोषण वाढते आणि यकृतात चरबी जमा होते. यामुळे जळजळ वाढते आणि यकृताचे नुकसान होते.
यकृत निरोगी ठेवण्यासाठी काय कराल?
प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा: कुकीज, कँडीज, सॉफ्ट ड्रिंक्स आणि सॉस यांचे सेवन कमी करा.
नैसर्गिक आहार: ताजी फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा.
जागरूकता: पॅकेज्ड फूड खरेदी करताना लेबल तपासा आणि हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असलेले पदार्थ टाळा.
पुढच्या वेळी गोड पेय किंवा प्रक्रिया केलेले अन्न निवडताना सावध रहा. तुमच्या यकृताचे आरोग्य टिकवण्यासाठी आजपासूनच निरोगी आहाराच्या सवयी अंगीकारा!




