Varsha Gaikwad : मुंबईतील आंदोलनात महिला आंदोलकाशी कथित गैरवर्तनाचा आरोप; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले

spot_img

मुंबई : मुंबईतील एका आंदोलनादरम्यान महिला आंदोलकाशी पोलिस कर्मचाऱ्याने कथित गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वर्षा गायकवाड यांनी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेबाबत अशा घटना घडणे ही गंभीर बाब असल्याची टीका केली. तर रोहित पवार यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर देशभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू असताना मुंबईतील या कथित घटनेने नव्या वादाला तोंड फुटले आहे. व्हायरल व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाची अधिकृत भूमिका आणि संबंधित कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ