Bharat Taxi App : मुंबई-पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! ‘भारत टॅक्सी’ सेवेला सुरुवात; पहिल्या 1.5 किमीचे भाडे फक्त 31 रुपये

spot_img

महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून नवा प्रयोग सुरू झाला आहे. महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘भारत टॅक्सी’ सेवेचा शुभारंभ नवी मुंबई विमानतळावर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सेवेचे लोकार्पण होणार आहे.

‘भारत टॅक्सी’च्या माध्यमातून कार, ऑटो-रिक्षा आणि बाइक टॅक्सी बुकिंगची सुविधा एकाच मोबाईल अॅपवर उपलब्ध होणार आहे. या व्यवस्थेत प्रवासी आणि चालक यांच्यात थेट संपर्क राहणार असल्याने मध्यस्थांची संख्या कमी होऊन सेवा अधिक पारदर्शक आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

भाड्याच्या बाबतीतही सरकारने परवडणारी रचना निश्चित केली आहे. पहिल्या १.५ किलोमीटरसाठी ३१ रुपये, तर त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी २१ रुपये आकारले जाणार आहेत. काळी-पिवळी टॅक्सीच्या धर्तीवर भाडे निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे शहरात ही सेवा सुरू केली जाणार आहे.

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ आणि प्रमुख राष्ट्रीय सहकारी संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ओला-उबरसारख्या अॅप-आधारित सेवांमुळे प्रवास सुलभ झाला असला, तरी पाऊस, सण किंवा मागणी वाढल्यावर भाडेवाढीचा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर सहकाराच्या माध्यमातून ‘भारत टॅक्सी’ हे पर्यायी मॉडेल उभे केले जात आहे.

या सेवेमुळे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी मिळण्याची शक्यता असून, सुरक्षित, परवडणारी आणि विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नवी मुंबई विमानतळाच्या पार्श्वभूमीवर ही सेवा प्रवाशांसाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ