Nilesh Rane : “हे षडयंत्र नाही, तुमचेच पाप!” विनायक राऊतांवर निलेश राणेंचा घणाघाती हल्ला

spot_img

सूनेच्या गंभीर आरोपांनंतर निलेश राणेंची ठाकरे गटाच्या माजी खासदारांवर जोरदार टीका; मनी लाँड्रिंगप्रकरणीही केला मोठा दावा.

शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या घरगुती वादावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश राऊत यांच्यावर त्यांच्याच सून गिरीजा यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. २०१७ मध्ये लग्न झाल्यापासून आपला मानसिक आणि भावनिक छळ करण्यात आला, तसेच फसवणूक झाल्याचा दावा गिरीजा यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, आपल्याला वेगवेगळ्या बाबा-बुवांकडे नेऊन आपल्यासोबत अघोरी कृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर राऊत यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधताना राणे म्हणाले की, “विनायक राऊत अशा प्रकारची कृत्यं करतात हे आम्ही आजवर ऐकून होतो, पण आता त्यांच्या घरातील माणसांनीच हे सत्य जगासमोर आणले आहे. हे कोणत्याही विरोधकांचे षडयंत्र नसून, विनायक राऊत यांनी स्वतः केलेले पाप आहे.” राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव खराब केल्याचे सांगत, अशा लोकांमुळे लाज वाटते, असेही राणे म्हणाले.

निलेश राणे यांनी पुढे बोलताना सांगितले की, नियतीने विनायक राऊत यांना त्यांच्या कर्माचा धडा शिकवला आहे. केवळ राणे कुटुंबावर टीका करणे आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न करणे एवढाच एककलमी कार्यक्रम राऊत यांनी राबवला. परंतु, आता स्वतःवरच तोंड लपवण्याची वेळ आली आहे. ज्यांनी तक्रार केली आहे त्यांच्याकडे अजूनही बरीच माहिती असून, आगामी काळात अनेक गोष्टी बाहेर येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

या कौटुंबिक वादासोबतच निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे (मनी लाँड्रिंग) गंभीर आरोप केले. राऊत यांना ‘काळाबाजारी’ संबोधत राणे म्हणाले की, मातोश्रीला खूश करण्यासाठी त्यांनी गेली १० वर्षे राणे कुटुंबावर टीका करण्याचे राजकारण केले. आता तपासातून केवळ १७ लाख रुपयेच नाही, तर १७ कोटींचे मनी लाँड्रिंग बाहेर येऊ शकते. हा तपास अत्यंत थक्क करणारा असेल, असा दावा करत विनायक राऊत हे आपल्यासाठी ‘झिरो’ (काहीही किंमत नसलेले) माणूस आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ