Vaibhav Sooryavanshi : विम्बल्डनच्या कोर्टवर भारतीय क्रिकेटर्सचा जलवा! फायनलपूर्वी केलेली वैभव सूर्यवंशीची ‘ती’ भविष्यवाणी तंतोतंत खरी

spot_img

यानिक सिनर सलग दुसऱ्यांदा किंग; सामना पाहण्यासाठी युवराज सिंग, अभिषेक शर्मासह संजू सॅमसनची सेंटर कोर्टवर हजेरी

विम्बल्डन २०२६ च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या यानिक सिनरने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा ६-७(७), ७-६, ६-३, ६-४ असा पराभव करत सलग दुसऱ्यांदा या ऐतिहासिक विजेतेपदावर आपले नाव कोरले. लंडनच्या ऐतिहासिक ‘सेंटर कोर्ट’वर रंगलेल्या या थरारक महामुकाबल्याचे साक्षीदार होण्यासाठी जगभरातील अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये नुकतीच इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका संपवून विसावा घेणारे भारतीय क्रिकेट संघाचे युवा तारे वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्यासह माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग विशेष आकर्षण ठरले.

क्रिकेटच्या मैदानात आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालणारा १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याची टेनिस कोर्टवरील एक भविष्यवाणी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सामन्यापूर्वी जिओस्टारशी संवाद साधताना वैभवने थेट यानिक सिनरच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता, जो नंतर तंतोतंत खरा ठरला. वैभव म्हणाला, “गेल्या ४-५ वर्षांपासून मी नियमितपणे टेनिस फॉलो करतोय. मी राफेल नादाल आणि नोव्हाक जोकोविचचा खेळ खूप जवळून पाहिला आहे, जोकोविच माझा ऑल-टाइम फेव्हरेट आहे. पण सध्याच्या पिढीत कार्लोस अल्काराझ चांगला असला, तरी या संपूर्ण स्पर्धेत यानिक सिनरने ज्या पद्धतीने वर्चस्व गाजवले आहे, ते पाहता तोच ही ट्रॉफी जिंकेल अशी मला आशा आहे.”

यावेळी वैभवला एक गमतीशीर प्रश्न विचारण्यात आला की, ‘जर तुला टेनिसमध्ये दुहेरी (Doubles) सामना खेळायची संधी मिळाली, तर तू कोणत्या क्रिकेटपटूला तुझा जोडीदार बनवशील?’ यावर वैभवने क्षणाचाही विलंब न लावता आपला सलामीचा जोडीदार अभिषेक शर्माचे नाव घेतले. “मला क्रिकेटच्या मैदानात अभिषेक भैय्यासोबत डावाची सुरुवात करायला आणि फलंदाजीचा आनंद घ्यायला खूप आवडते. त्यामुळे टेनिस कोर्टवरही जोडीदार म्हणून माझी पहिली पसंती त्यालाच असेल,” असे वैभवने हसतमुखपणे सांगितले.

युवराज सिंग, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी यांचे विम्बल्डनच्या मैदानातील स्टायलिश लूक मधील फोटो आणि व्हिडिओ सध्या क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड पसंत केले जात असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ