PepsiCo CEO Indra Nooyi : “स्वच्छता हवी असेल तर भारतात राहूच शकत नाही”; पेप्सिकोच्या माजी CEO इंदिरा नूयींच्या विधानाने भारतीयांचा संताप!

spot_img

“अमेरिकेत आले नसते तर कधीच CEO बनू शकले नसते”; भारत आणि चीनची तुलना करत भारताबद्दल धक्कादायक वक्तव्य, सोशल मीडियावर तीव्र पडसाद.

जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी प्रत्येक भारतीयाला आपल्या मातृभूमीचा अभिमान असतो. परंतु, ‘पेप्सिको’ (PepsiCo) कंपनीच्या माजी सीईओ आणि भारतीय वंशाच्या प्रसिद्ध महिला व्यावसायिक इंदिरा नूयी यांनी भारताबद्दल केलेल्या एका विधानामुळे सध्या सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला आहे. ‘हुवर इन्स्टिट्युशन’ (Hoover Institution) साठी माजी अमेरिकन परराष्ट्र मंत्री काँडोलीझा राईस यांनी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत, इंदिरा नूयी यांनी भारत आणि चीनची तुलना करत भारताला ‘अव्यवस्थित’ (Chaotic) देश म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतातील नेटकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

“जर तुम्हाला शिस्त, सुव्यवस्था आणि स्वच्छ जीवनशैली आवडत असेल, तर तुमच्यासाठी भारतात राहणे अशक्य आहे. भारताचे सौंदर्य तिथल्या अव्यवस्थेतच (Chaos) दडलेले आहे.” — इंदिरा नूयी

मुलाखतीत आपल्या यशाचे श्रेय अमेरिकेला देताना इंदिरा नूयी म्हणाल्या, “मी जर भारतातून अमेरिकेत आले नसते, तर आज मी ज्या स्थानावर आहे तिथे कदाचित कधीच पोहोचू शकले नसते. खिशात काहीही न घेता अमेरिकेत येऊन इथल्या एका प्रतिष्ठित जागतिक कंपनीचे सर्वोच्च पद (CEO) भूषवणे, हे केवळ अमेरिकेतच शक्य आहे. भारतात राहून मी कधीही सीईओ बनू शकले नसते.”

पुढे बोलताना त्यांनी पर्यटन आणि जीवनशैलीच्या मुद्द्यावरून थेट भारत आणि चीनमध्ये तुलना केली. त्यांच्या मते, एक पर्यटक म्हणून भारतापेक्षा चीनमध्ये फिरणे अधिक सोपे आणि सोयीस्कर आहे, कारण चीनमध्ये एकसारखेपणा आणि सुव्यवस्था आहे. ज्या लोकांना अतिशय स्वच्छ आणि शिस्तबद्ध वातावरणात राहणे आवडते, त्यांना भारत समजणे कठीण जाईल. रस्त्यावरून गाड्यांसोबत चालणाऱ्या गायी हे इथल्या जीवनशैलीचे अंग बनले आहे.

स्वातंत्र्यानंतर अवघ्या ७-८ वर्षांनी आपला जन्म झाला होता, त्या काळाची आठवण सांगताना त्या म्हणाल्या की, तत्कालीन भारतीय समाजात महिलांना घराबाहेर पडून स्वप्ने पाहण्याची फारशी मुभा नव्हती. मात्र, त्यांच्या आजीने आणि वडिलांनी त्यांना नेहमीच जग जिंकण्यासाठी आणि मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरित केले, ज्यामुळे त्यांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला.

चीनच्या हुकूमशाही व्यवस्थेचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की, तिथल्या केंद्रीय व्यवस्थेमुळे चीन आज महासत्ता बनला आहे. याउलट, भारतात लोकशाही असल्याने आणि प्रत्येकाला मतदानाचा अधिकार असल्याने भारताचा महासत्ता बनण्याचा प्रवास संथ गतीने सुरू आहे; मात्र भारताची ही लोकशाही व्यवस्थाच उत्तम आहे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि भविष्यासाठी अमेरिका हा एक नैसर्गिक आणि अत्यंत महत्त्वाचा भागीदार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. असे असले तरी, मूळ भारतात वाढून देशाच्या स्वच्छतेवर आणि व्यवस्थेवर अशा प्रकारे टिप्पणी केल्यामुळे भारतीय नागरिकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ