Sachin Ahir : नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा थांबली, “मी नाराज नाही” म्हणत गोऱ्हेंनी स्पष्ट केला आपला पवित्रा

spot_img

विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाने सचिन आहिर यांचे नाव पुढे केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपासून या पदासाठी नीलम गोऱ्हे यांच्या नावाची जोरदार शक्यता वर्तवली जात होती, त्यामुळे आहिर यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर अनेकांना आश्चर्य वाटले. उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. या घडामोडीनंतर नीलम गोऱ्हे नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला, मात्र त्यांनी स्वतः पुढे येत या सर्व अफवांना विराम दिला.

“मी अजिबात नाराज नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी सचिन आहिर यांच्या उमेदवारीची पुष्टीही केली. दरम्यान, काही राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत समीकरणांमुळे त्यांना डावलल्याच्या चर्चाही रंगल्या, पण गोऱ्हेंनी त्यावर अधिक प्रतिक्रिया देणे टाळले. आता पक्ष त्यांना पुढे कोणती नवी जबाबदारी देतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ