‘वॉटरप्रूफ’ आणि ‘वॉटर रेसिस्टंट’ मधील फरक ओळखा; पावसाळी प्रवासात गॅजेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी सोप्या स्मार्ट ट्रिक्स
पावसाळा सुरू झाला की ऑफिस, कॉलेज किंवा दैनंदिन प्रवासासाठी बाहेर पडताना आपल्यासोबत असणारे लॅपटॉप, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स सुरक्षित ठेवणे हे एक मोठे आव्हान असते. पाऊस आणि पाण्याचे थेंब गॅजेट्समध्ये जाऊन नुकसान होऊ नये म्हणून अनेक जण बाजारातून महागड्या आणि आकर्षक रंगांच्या ‘वॉटरप्रूफ’ बॅग्ज खरेदी करतात. मात्र, कित्येकदा हजारो रुपये खर्च करून आणि उत्तम ब्रँडची बॅग घेऊनही मुसळधार पावसात बॅगेतील सामान ओले झाल्याचे समोर येते. याचे मुख्य कारण म्हणजे बाजारात मिळणाऱ्या सर्वच बॅग्ज खऱ्या अर्थाने वॉटरप्रूफ नसतात. त्यामुळे पावसाळ्यात बॅग खरेदी करताना ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी आणि साहित्याच्या सुरक्षिततेसाठी काही तांत्रिक गोष्टी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारात मिळणाऱ्या बॅग्ज अनेकदा ‘वॉटरप्रूफ’ नसून केवळ ‘वॉटर रेसिस्टंट’ (Water Resistant) असतात. वॉटर रेसिस्टंट बॅग्ज काही प्रमाणातील पाण्याचे थेंब अडवू शकतात, पण मुसळधार पावसात किंवा जास्त वेळ पाण्यात राहिल्यास त्यांच्यातून पाणी आत शिरतेच. त्यामुळे खरेदी करताना बॅग पूर्णपणे वॉटरप्रूफ असल्याची खात्री करा. पावसाळ्यासाठी प्रामुख्याने नायलॉन (Nylon) किंवा उच्च दर्जाच्या पॉलिस्टर मटेरियलपासून बनवलेल्या बॅग्ज वापरण्यास प्राधान्य द्यावे, कारण या कापडाची विणकाम अशी असते की त्यातून पाणी आत झिरपत नाही.
खरेदी करताना लक्षात ठेवायच्या ५ स्मार्ट टिप्स:
- रबर कोटेड झिप (Rubber Coated Zipper): बॅगचे कापड कितीही चांगले असले, तरी अनेकदा झिपच्या फटीतून पाणी आत जाते. म्हणूनच बॅग घेताना तिची झिप रबर कोटिंग असलेली किंवा वॉटरप्रूफ शील्डने कव्हर केलेली आहे का, हे नक्की तपासा.
- रोल-टॉप बॅग्ज (Roll-Top Bags): जर तुम्ही बाईक किंवा स्कूटीवरून प्रवास करत असाल, तर ‘रोल-टॉप’ प्रकारच्या बॅग्ज तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरतील. या बॅग्जला वरच्या बाजूला चेन ऐवजी कापड फोल्ड करून लॉक करण्याची सोय असते, ज्यामुळे मुसळधार पावसातही पाण्याचा एक थेंबही आत जाऊ शकत नाही.
- इन-बिल्ट रेन कव्हर (Rain Cover): नेहमी अशी बॅग निवडा ज्याच्या तळाशी किंवा खिशात स्वतंत्र ‘रेन कव्हर’ दिलेले असते. पाऊस जास्त वाढल्यास हे कव्हर बॅगवर चढवून दुहेरी संरक्षण मिळवता येते.
- ब्रिदेबल मेश (Breathable Mesh): बॅगच्या पाठीच्या भागाला आणि पट्ट्यांना जाळीदार म्हणजेच ‘ब्रिदेबल मेश’ असणे गरजेचे आहे. यामुळे बॅग जरी पावसात ओली झाली, तरी ती पाठीला चिकटत नाही आणि तिला कुबट वास येत नाही.




