Mrunal Thakur and Dhanush Part Ways : साऊथ सुपरस्टारच्या प्रेमात वेडी झाली होती ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री; दोन मुलांच्या वडिलांसोबतच्या ब्रेकअपची इनसाईड स्टोरी!

spot_img

आपल्या सख्ख्या अभिनयाने बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता धनुष यांच्या कथित नात्याबाबत सध्या मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या दोघांच्या डेटींगच्या आणि अगदी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या अफवांना उधाण आले होते. मात्र, आता समोर आलेल्या एका मोठ्या अपडेटनुसार, या जोडप्याच्या नात्यात दुरावा आला असून त्यांचे मार्ग अधिकृतपणे वेगळे झाल्याचे वृत्त आहे. ‘फिल्मफेअर’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मृणाल आणि धनुष यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

या दोघांनीही आपल्या नात्यावर कधी उघडपणे भाष्य केले नसले तरी, विविध बॉलिवूड आणि साऊथच्या पार्ट्यांमधील त्यांची एकत्र उपस्थिती नेहमीच चर्चेचा विषय ठरली होती. विशेषतः मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटाच्या प्रीमियरला धनुषने लावलेली हजेरी त्यांच्यातील प्रेमाची साक्ष देत असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला होता. धनुषने यापूर्वी २०२२ मध्ये रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या हिच्याशी १८ वर्षांचा संसार मोडल्यानंतर आपले वैयक्तिक आयुष्य नेहमीच मीडियापासून दूर ठेवले आहे आणि मृणालने देखील या चर्चांवर कधी जाहीर प्रतिक्रिया दिली नाही. या ब्रेकअपचे नेमके कारण काय आहे, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

व्यावसायिक आघाड्यांवर विचार केल्यास, मृणाल ठाकूर सध्या तिच्या करिअरच्या सुवर्णकाळात आहे. ‘सीता रामम’ आणि ‘हाय नन्ना’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर या वर्षात तिचे ‘दो दिवाने शहर में’, ‘डकैत: अ लव्ह स्टोरी’ आणि ‘है जवानी तो इश्क होना है’ हे तीन मोठे सिनेमे रुपेरी पडद्यावर आले आहेत. आगामी काळातही ती ‘पूजा मेरी जान’ आणि ‘राका’ सारख्या बहुप्रतिक्षित चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एकीकडे करिअरचा आलेख उंचावत असतानाच मृणालच्या वैयक्तिक आयुष्यातील या पडझडीमुळे सोशल मीडियावर मात्र उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ