Dhurandhar 2 Unmuted Version : बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘धुरंधर २’ चा ओटीटीवर धमाका; आता घरबसल्या पाहता येणार ‘अनकट’ व्हर्जन!

spot_img

जिओ-हॉटस्टारनंतर आता नेटफ्लिक्स इंडियावर कोणत्याही ‘बीप’शिवाय मूळ स्वरूपात सिनेमा उपलब्ध

अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ या सिनेमांनी २०२६ मध्ये बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे शिखर गाठले आहे. थिएटरमध्ये कोट्यवधींची कमाई करत धुमाकूळ घातल्यानंतर, आता या फ्रँचायझीचा दुसरा भाग म्हणजेच ‘धुरंधर २’ (धुरंधर: द रिवेंज) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. यापूर्वी हा सिनेमा भारतीय प्रेक्षकांसाठी जिओ-हॉटस्टारवर उपलब्ध करून देण्यात आला होता, परंतु तिथे प्रेक्षकांना सेन्सॉर केलेला व्हर्जन पाहावा लागला होता. आता मात्र भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या ब्लॉकबस्टर सिनेमाचे सर्व ‘अनकट’ आणि ‘अनम्यूटेड’ सीन्स प्रेक्षकांना घरबसल्या अनुभवता येणार आहेत.

‘धुरंधर २’ चा हा मूळ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला ‘रॉ’ व्हर्जन आता नेटफ्लिक्स इंडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामुळे भारतीय प्रेक्षकांना आता कोणत्याही ‘बीप्स’ किंवा कात्रीशिवाय सिनेमातील सर्व संवाद आणि धडाकेबाज ॲक्शन सीन्स त्यांच्या मूळ स्वरूपात पाहता येतील. विशेष म्हणजे, नेटफ्लिक्सवर हा सिनेमा केवळ हिंदीतच नाही, तर तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा एकूण पाच भाषांमध्ये उपलब्ध आहे. या सिनेमात रणवीर सिंगसोबत अवघ्या २० वर्षांच्या सारा अर्जुन हिने मुख्य भूमिका साकारली असून संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

कमाईच्या बाबतीत या फ्रँचायझीने भारतीय चित्रपटसृष्टीचे अनेक जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागाने जगभरात १,३०० कोटींहून अधिक गल्ला जमवला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत आलेल्या ‘धुरंधर २’ ने तर बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडला. या दुसऱ्या भागाने एकट्या भारतात १,१५० कोटींची कमाई केली, तर जगभरात तब्बल १,८०० कोटी रुपयांचा टप्पा पार करत इतिहास रचला आहे. आता थिएटर गाजवल्यानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ