Crime News : खान सरांच्या क्लासवरील गोळीबार प्रकरणाला नवे वळण; नेपाळमधील हॉटेलमध्ये आढळला प्रिंस यादवचा मृतदेह

spot_img

ज्ञान बिंदू अकॅडमीचे संचालक रोशन आनंदचा भाऊ, प्रिन्स यादव यांचा मृतदेह नेपाळमधील विराटनगर येथील एका हॉटेलमध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी विविध अंगांनी चौकशी केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलमधून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून घटनेशी संबंधित काही संशयित व्यक्तींनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रिंस यादव हे ज्ञान बिंदू अकॅडमीच्या प्रशासकीय आणि इतर कामकाजात सक्रिय भूमिका बजावत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणाचा संबंध त्यांच्या अलीकडील कायदेशीर अडचणींशी आहे का, याचाही तपास सुरू असल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वीच एका चर्चित प्रकरणात रोशन आनंद आणि प्रिंस यादव यांची नावे समोर आली होती. त्यानंतर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, अटकेची शक्यता लक्षात घेऊन प्रिंस यादव यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतल्याची चर्चा होती. मात्र त्याच काळात त्यांचा मृतदेह आढळल्याने या संपूर्ण घटनेभोवती गूढ अधिकच वाढले आहे.

दरम्यान, नेपाळ पोलिसांनी या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर तांत्रिक पुराव्यांचीही तपासणी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. मृत्यू नैसर्गिक, आत्महत्या किंवा इतर कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाही.

या घटनेमुळे संबंधित परिसरात तसेच अकॅडमीशी निगडित वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, तपासातून नेमके सत्य काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ