Vaibhav Sooryavanshi : टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्यावर संकटाचे ढग! बेलफास्ट मधील हिंसाचारामुळे बीसीसीआयची चिंता वाढली; युवा खेळाडूच्या पदार्पणाला ब्रेक लागणार?

spot_img

बेलफास्टमधील चाकू हल्ला आणि स्थलांतरितांविरोधातील आंदोलनानंतर परिस्थिती तणावपूर्ण; ‘क्रिकेट आयर्लंड’ सुरक्षा व्यवस्थेवर ठेवणार बारीक लक्ष.

भारतीय क्रिकेट संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत व्यस्त आहे. एकमेव कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका संपताच भारतीय खेळाडू दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी युनायटेड किंगडम (UK) म्हणजेच आयर्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहेत. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वीच भारताच्या या आयर्लंड दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. आयर्लंडमधील बेलफास्ट शहरात उसळलेल्या भीषण हिंसाचारामुळे भारतीय संघाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, बीसीसीआयची (BCCI) धाकधूक चांगलीच वाढली आहे. जर हा दौरा काही कारणास्तव रद्द किंवा लांबणीवर पडला, तर आयपीएल गाजवून संघात स्थान मिळवणाऱ्या १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बेलफास्ट शहरात अलीकडेच झालेल्या एका चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर तिथे स्थलांतरितांविरुद्ध तीव्र हिंसक निदर्शने सुरू झाली आहेत. चेहऱ्यावर मुखवटे लावलेल्या आंदोलकांनी अनेक वाहने पेटवून दिली असून, दुकाने आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान केले आहे. या बिघडत्या परिस्थितीची दखल घेत ‘क्रिकेट आयर्लंड’ने एक अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. “आम्ही स्थानिक अधिकारी आणि प्रांतीय संघटनांच्या सतत संपर्कात असून, खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि चाहत्यांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून लिस्बर्न येथील ‘इंटर-प्रोव्हिन्शियल टी-20 फेस्टिव्हल’ आधीच रद्द करण्यात आला आहे, तर आगामी सामन्यांबद्दल पुढील ४८ तासांत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. बेलफास्टवरून सामने दुसऱ्या ठिकाणी हलवायचे की नाही, यावर बीसीसीआय आणि क्रिकेट आयर्लंड परिस्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतील.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ