Team India T20 List : इंग्लंड-आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला मोठी संधी

spot_img

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाची घोषणा करण्यात आली असून, संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे. या निवडीमुळे संघात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत. यापूर्वी कर्णधार असलेल्या सूर्यकुमार यादवला यावेळी केवळ नेतृत्वातूनच नव्हे तर संपूर्ण संघातूनही वगळण्यात आले आहे. तर युवा फलंदाज तिलक वर्मा याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात निवड समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. आगामी मालिकांसाठी युवा आणि प्रतिभावान खेळाडूंना प्राधान्य देण्यात आल्याचे या निवडीवरून स्पष्ट झाले. विशेष आकर्षण ठरला तो अवघ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी. आयपीएलमधील प्रभावी कामगिरीच्या जोरावर त्याने प्रथमच वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवले असून, त्याच्या निवडीची क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

संघात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रिन्स यादव, हर्षित राणा आणि रवी बिश्नोई यांचाही समावेश करण्यात आला आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल साधत निवडलेल्या या संघाकडून आगामी दौऱ्यात दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ