FIFA World Cup 2026 : नायजेरिया ‘अपात्र’, मेस्सी ‘विजेता’! फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनासाठी पुन्हा तोच ‘लकी’ योग?

spot_img

२०२२ चा इतिहास पुनरावृत्तीच्या उंबरठ्यावर; अनुभवी ताकदीसह अर्जेंटिना जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार

फुटबॉल विश्वातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची ‘फिफा वर्ल्डकप २०२६’ स्पर्धा येत्या १२ जूनपासून सुरू होत आहे. गतविजेता अर्जेंटिना संघ यंदा आपले जेतेपद राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. कतारमध्ये पार पडलेल्या गेल्या विश्वचषकात फ्रान्सचा पराभव करत अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरले होते. विशेष म्हणजे, यंदाच्या २०२६ च्या स्पर्धेतही एक असा विलक्षण योग जुळून आला आहे, ज्यामुळे मेस्सी आणि अर्जेंटिनाचे चाहते पुन्हा एकदा विजेतेपदाचा जल्लोष करण्यासाठी उत्सुक आहेत. हा रंजक योग थेट नायजेरिया संघाच्या कामगिरीशी जोडलेला आहे.

फुटबॉल इतिहासातील आकड्यांवर नजर टाकल्यास, जेव्हा जेव्हा नायजेरियाचा संघ विश्वचषक स्पर्धेसाठी अपात्र ठरला आहे, तेव्हा तेव्हा अर्जेंटिनाने विश्वविजेतेपदाचा मुकुट परिधान केला आहे. हा योगायोग पुढीलप्रमाणे दिसून येतो:

  • १९७८ चा विश्वचषक: नायजेरिया अपात्र ठरला आणि अर्जेंटिनाने आपले पहिले विजेतेपद पटकावले.
  • १९८६ चा विश्वचषक: नायजेरिया पुन्हा अपात्र राहिला आणि अर्जेंटिनाने दुसऱ्यांदा इतिहास रचला.
  • २०२२ चा विश्वचषक: तब्बल ३६ वर्षांनंतर नायजेरिया पुन्हा बाद झाला आणि लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा ट्रॉफी उंचावली.

योगायोगाची हीच मालिका यंदाही कायम आहे, कारण २०२६ च्या विश्वचषकासाठीही नायजेरियाचा संघ पात्र ठरू शकलेला नाही. त्यामुळे हा ‘लकी फॅक्टर’ मेस्सीच्या संघाला पुन्हा एकदा चॅम्पियन बनवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गट ‘जे’ मधील आव्हान आणि बलाढ्य संघ

यंदाच्या स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ ‘गट जे’ (Group J) मध्ये असून, त्यांचा पहिला सामना १६ जून रोजी अल्जेरियाविरुद्ध होणार आहे. या गटात ऑस्ट्रेलिया आणि जॉर्डन या संघांचाही समावेश असल्याने अव्वल स्थान मिळवण्यासाठी चुरस पाहायला मिळेल.

गतविजेत्या संघात यंदा अनुभवी आणि नव्या दमाच्या खेळाडूंचा उत्तम ताळमेळ पाहायला मिळत आहे. २०२२ च्या विजेत्या संघातील तब्बल १७ खेळाडूंचा यंदाच्या २६ जणांच्या संघात समावेश करण्यात आला असून, संघाची धुरा पुन्हा एकदा अनुभवी लिओनेल मेस्सीकडे सोपवण्यात आली आहे.

फिफा विश्वचषक २०२६ साठी अर्जेंटिनाचा संपूर्ण संघ:

पोझिशनखेळाडूंची नावे
गोलरक्षकएमिलियानो मार्टिनेझ, जेरोनिमो रुल्ली, जुआन मुसो
बचावपटू (Defenders)गोन्झालो मॉन्टिएल, नहुएल मोलिना, लिसांड्रो मार्टिनेझ, निकोलस ओटामेंडी, लिओनार्डो बालेर्डी, क्रिस्टियन रोमेरो, निकोलस टॅगलियाफिको, फॅकुंडो मेडिना
मिडफिल्डरजिओवानी लो सेल्सो, लिएंड्रो परेडिस, रॉड्रिगो डी पॉल, एक्क्विएल पॅलासिओस, एन्झो फर्नांडीझ, ॲलेक्सिस मॅक ॲलिस्टर, व्हॅलेंटीन बारको
फॉरवर्ड्सलिओनेल मेस्सी, निकोलस गोन्झालेझ, ज्युलियानो सिमोन, लॉटारो मार्टिनेझ, जोस मॅन्युएल लोपेझ, ज्युलियन अल्वारेझ, थियागो अल्माडा, निको पाझ
हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ